सॅमसंगचा बहुप्रतिक्षित Galaxy Unpacked 2026 कार्यक्रम आज पार पडणार असून, या इव्हेंटमध्ये Galaxy Z Fold 8, Galaxy Z Fold 8 Ultra, Galaxy Z Flip 8 आणि नवीन Galaxy Watch मालिकेसह AI-आधारित नव्या उत्पादनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.
Samsung Galaxy Unpacked 2026 आज; नवीन फोल्डेबल स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचवरून पडदा, लाइव्ह पाहायचे कसे?
सॅमसंगचा बहुप्रतिक्षित Galaxy Unpacked 2026 कार्यक्रम आज पार पडणार असून, जगभरातील टेकप्रेमींचे लक्ष या इव्हेंटकडे लागले आहे. यंदाच्या कार्यक्रमात कंपनी आपल्या पुढील पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि AI-आधारित नव्या उत्पादनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम लंडनमध्ये आयोजित करण्यात आला असून, जगभरातील प्रेक्षकांना तो ऑनलाइन लाइव्ह पाहता येणार आहे.
भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम आज संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. हा इव्हेंट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, Samsung Newsroom आणि अधिकृत YouTube चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.
यंदाच्या Galaxy Unpacked कार्यक्रमात Galaxy Z Fold 8, Galaxy Z Fold 8 Ultra आणि Galaxy Z Flip 8 हे तीन फोल्डेबल स्मार्टफोन सादर होण्याची सर्वाधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय Galaxy Watch 9, Galaxy Watch Ultra 2 आणि AI तंत्रज्ञानावर आधारित काही नवीन उत्पादनांची झलकही पाहायला मिळू शकते.
लीक्सनुसार, Galaxy Z Fold 8 मध्ये अधिक रुंद डिस्प्ले, Snapdragon 8 Elite प्रोसेसर, सुधारित कॅमेरा आणि अधिक टिकाऊ हिंज डिझाइन मिळू शकते. तर Galaxy Z Fold 8 Ultra हा सर्वाधिक प्रीमियम मॉडेल असण्याची शक्यता असून त्यात ५,०००mAh बॅटरी आणि अधिक प्रगत AI फीचर्स दिले जाऊ शकतात. Galaxy Z Flip 8 मध्येही मोठी बॅटरी आणि सुधारित परफॉर्मन्स मिळण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय Galaxy Watch 9 आणि Galaxy Watch Ultra 2 मध्ये अधिक तेजस्वी डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि नवीन AI-आधारित हेल्थ फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. काही अहवालांनुसार, सॅमसंग आपल्या आगामी AI स्मार्ट ग्लासेसची झलकही या कार्यक्रमात दाखवू शकते.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,590
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹41,061
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999