Photo Credit: Lava
Lava Blaze 3 5G भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Lava Blaze 2 5G नंतर हा फोन आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा फोन आला होता. या फोन मध्ये 90Hz चा डिस्प्ले आहे. तर MediaTek Dimensity 6300 chipset आहे सोबतच artificial intelligence चं देखील फीचर या फोनमध्ये देण्यात आलं आहे. या फोन मध्ये वाइब लाइट फीचर आहे त्यामुळे फोटो काढताना चांगलं लाईटिंग राहणार आहे.
भारतामध्ये Lava Blaze 3 5G या स्मार्टफोनची किंमात 11,499 पासून सुरू होते. कंपनीकडून सांगितल्याप्रमाणे ही स्पेशल लॉन्च किंमत आहे. काही बॅंक ऑफर्स युजर्सनी वापरल्या तर हा फोन 9999 पर्यंत मिळू शकतो. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या पर्यायासह उपलब्ध आहे. 18 सप्टेंबर पासून अमेझॉन वर या फोनची विक्री ठीक रात्री 12 वाजल्यापासून सुरू झाली आहे. फोन सोबत एका वर्षांची गॅरंटी देखील मिळणार आहे.
Lava Blaze 3 5G हा स्मार्टफोन 2 रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्लास ब्लू (Glass Blue) आणि ग्लास गोल्ड (Glass Gold)या रंगामध्ये उपलब्ध आहे.
Lava Blaze 3 5G या फोनचा डिस्प्ले 6.56-इंच HD+ hole-punch सह उपलब्ध आहे. याचं रेझ्युलेशन 720x1,600 pixels आहे. तर रिफ्रेश रेट 90Hz आहे. पिक्सेल डेंसिटी ही 269 ppi आहे. फोन हा 164.3×76.24×8.6mm आकारामध्ये आहे. तर फोनंचं वजन 201 ग्रॅम आहे. या फोनचा प्रोसेसर MediaTek Dimensity 6300 आहे. या फोनचं स्टोरेज 1 टीबी पर्यंत microSD card च्या मदतीने वाढवता येऊ शकते. रॅम देखील व्हर्च्युअली 6 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन अॅन्ड्रॉईड 14 वर चालणार आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 18W फास्टस्टिंग सुविधा आहे. त्यामुळे एकदा चार्जिंग केल्यानंतर दिवसभर ते पुरणार आहे. दरम्यान या स्मार्टफोन मध्ये क्लीन आणि एड-फ्री अॅड्रॉइड ओएस आहे.
Lava Blaze 3 5G या फोन मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा आहे. त्यामध्ये 50 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आहे. त्याचं aperture f/1.8 आहे. तर 2 मेगा पिक्सेलचा सेकेंडरी AI camera आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेल्फी साठी आहे. या स्मार्टफोनमध्ये 2K resolution पर्यंत रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. प्रति सेकंद 30 फ्रेम्स पर्यंत रेकॉर्डिंग होईल.त्यामुळे आता या फोनवर आता 1440p@30fps आणि 1080p@30fps मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. AI Emoji Mode, Portrait Mode, Pro Video Mode, Dual View Video, आणि AI Mode यामध्ये मिळणार आहेत.
फोनमध्ये कनेक्टीव्हिटीचा विचार करता या हॅन्डसेटला यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. 3.5 एमएम चा हेडफोन जॅक आहे. हा फोन 5 जीला सपोर्ट करणारा आहे. ड्युअल 4G VoLTE, ड्युअल-बँड वाय-फाय 5 आणि ब्लूटूथ 5.2. हे GLONASS आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी यात साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील मिळणार आहे.
लावा या भारतीय मल्टिनॅशनल कंपनीने भारतीय बाजारपेठेत आणलेला हा स्मार्टफोन आता बजेट मध्ये नवा फोन विकत घेणार्यांसाठी एक चांगला पर्याय आहे.
जाहिरात
जाहिरात