मायक्रो RNA च्या जीन कोडिंग मध्ये म्युटेशन झाल्यास मानवी शरीरामध्ये ऐकण्याची क्षमता, डोळे आणि शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये बिघाड होतात
Photo Credit: microRNA
Victor Ambros and Gary Ruvkun won the 2024 Nobel Prize for discovering microRNA
यंदाचा मेडिसिन किंवा फिजियोलॉजी मधील नोबेल पुरस्कार विक्टर एम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रुवकुन (Gary Ruvkun) यांना जाहीर झाला आहे. दोघांच्या संशोधनाला small RNA segments म्हणून ओळखले जात असे, ज्यांना microRNAs म्हणूनही ओळखले जाते. शरीरात protein production निर्माण करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. दोन्ही वैज्ञानिकांनी 1993 मध्ये मायक्रो RNA चा शोध लावला होता. मानवी शरीरात जिन्स हे DNA आणि RNA यांनी बनते. मायक्रो RNA हा मूळ RNA चा एक भाग होता.
Ambros आणि Ruvkun यांचं संशोधन हे Caenorhabditis elegans अर्थात एका लहान पारदर्शी worm मधून सुरूवात झाली. त्यांचं मुख्य लक्ष्य हे दोन जिन्स वर होते. यामध्ये lin-4 आणि lin-14 यांचा समावेश होता. Ambros यांनी सुरूवातीला lin-4 gene मध्ये RNA segment जोडलेले असल्याचं सांगितलं. हा समोर आलेला पहिला microRNA आहे. Ruvkun यांनी नंतर lin-4 microRNA lin-14 जनुकाच्या mRNA ला जोडते, त्याच्या संबंधित प्रथिनांचे उत्पादन कमी करते हे समोर आणले.
MicroRNAs हे सुरूवातीला विशिष्ट worms असतील असं वाटत होतं पण नंतर संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार ते मनुष्यासह सार्या animal kingdom मध्ये असतो. small RNAs मानवी आरोग्यावर कसे परिणाम करतात या संशोधनाच्या यामुळे वाटा उघडणार आहेत. कॅन्सर, हृद्यविकार आणि neurodegenerative conditions मध्ये उपचारात त्याची मदत होणार आहे. मायक्रो RNA च्या जीन कोडिंग मध्ये म्युटेशन झाल्यास मानवी शरीरामध्ये ऐकण्याची क्षमता, डोळे आणि शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये बिघाड होतात. मायक्रो आरएनएमध्ये असामान्य बदल झाल्यामुळे कर्करोग आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात.
फिजियोलॉजी किंवा मेडिसिनसाठीच्या नोबेल समितीचे उपाध्यक्ष ओले कॅम्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप त्याचा कोणताही वैद्यकीय अॅप्लिकेशन नाही. पण सेल कसे काम करते? ती काय करते? ती कशी करते? हे समजून घेण्यासाठी त्यांचा शोध आवश्यक होता. पण हा शोध भविष्यात खूप उपयोगी ठरणार आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Sarvam Maya Set for OTT Release on JioHotstar: All You Need to Know About Nivin Pauly’s Horror Comedy
Europa’s Hidden Ocean Could Be ‘Fed’ by Sinking Salted Ice; New Study Boosts Hopes for Alien Life