Infinix या स्मार्टफोन कंपनीने नुकताच त्यांचा पहिला वहिला टॅबलेट लॉन्च करत असल्याच्या अनेक अफवांना उधाण आले होते. परंतु आता या अफवा खऱ्या ठरत आहेत आणि Infinix चा पहिला टॅबलेट म्हणजेच Infinix XPad हा लवकरच लॉन्च होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. चला तर मग बघूया केव्हा होणार आहे टॅबलेट लॉन्च आणि काय आहेत त्याची वैशिष्ट्ये.
Infinix XPad हा टॅबलेट भारतात अधिकृतपणे 13 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. परंतु हा टॅबलेट कुठे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे आणि त्याची किंमत काय असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 13 सप्टेंबर ची वाट पाहावी लागणार आहे, कारण अजूनही कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण अंदाजे या टॅबलेटची किंमत ही 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तसेच हा टॅबलेट राखाडी, सोनेरी आणि निळा अशा तीन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Infinix XPad हा Infinix चा पहिलाच टॅबलेट असल्याने फार विशेष आहे. सर्वप्रथम आपण पाहूया, याचा डिस्प्ले जी 11 इंचाची LCD स्क्रीन असून, 1920 × 1200 पिक्सेल च्या FHD+ रेसोल्युषन सोबतच, 90Hz चा रिफ्रेश दर असलेला डिस्प्ले बसविण्यात आला आहे, ज्याचा स्क्रीन तो बॉडी हा रेशो 83% इतका आहे. या टॅबलेटचे आश्चर्य जनक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला चार स्पीकर्स देखील मिळतात.
गेल्या महिन्याच्या जागतिक सुचीमध्ये Infinix XPad हा टॅबलेट MediaTek Helio G99 SoC Ultimate या चीपद्वारे समर्थित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या टॅबलेट मध्ये रॅमचे दोन पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे 4 GB आणि 8 GB रॅम क्षमता. त्यासोबतच जर या टॅबलेटच्या अंतर्गत स्टोरेज क्षमतेमध्ये 128 GB आणि 256 GB असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या टॅबलेटच्या कॅमेऱ्याबद्दल पाहायचे तर मागील प्राथमिक कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा दोन्ही देखील 8 मेगापिक्सलचे देण्यात आले आहेत.
त्यासोबतच Infinix XPad ची बॅटरी ही 7000 mAh ची असून ती 18 वॅटच्या रॅपिड चार्जिंगचे समर्थन करते. यामध्ये ChatGPT ने प्रस्तुत असलेला व्हॉईस असिस्टंट देखील बसविण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात