जसे रोजच्या जीवनात स्मार्टफोन्स ची मागणी वाढतच चालली आहे, तसेच टॅबलेटची सुद्धा मागणी कमी होताना दिसून येत नाही आहे. हल्लीच मे महिन्यात Apple ने त्यांचा एक IPad लॉन्च केला होता आणि आगामी काळात Samsung सुध्दा Tab 10 वर काम करत असल्याची अफवा समोर येत आहे. एवढेच नाही तर टॅबलेटच्या या बाजारात OnePlus आणि Xiaomi सारख्या ब्रँड्स ने देखील उडी घेतली आहे. त्यामध्ये आता अजून एका ब्रँडने म्हणजेच Infinix ने सुध्दा उडी घेतली आहे, जे त्यांचा नवीन टॅबलेट Infinix XPad सोबत बाजारात प्रवेश करणार आहे. चला तर मग बघुया, काय आहेत Infinix च्या या टॅबलेटची वैशिष्ट्ये.
Infinix XPad च्या लॉन्च ची तारीख आणि किंमत.
Infinix ने अलीकडेच कंपनीचा पहिला लॅपटॉप लॉन्च केला होता, जो आपल्या वापरकर्त्यांना कमी किंमतीमध्ये चांगला गेमिंग अनुभव देण्यासाठी ओळखला जात आहे. त्यामुळे आता Infinix चा टॅबलेट म्हणजेच Infinix XPad सुध्दा ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीचा हा पहिलाच टॅबलेट असून त्याचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात सुरू आहे, जे केव्हाही ही संपेल आणि हा टॅबलेट लॉन्च करण्यात येईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2024 मध्ये सुद्धा Infinix XPad लॉन्च होऊ शकतो. पण नक्की कोणत्या तारखेला याबाबत अजूनही कंपनीने मौन बाळगले आहे, त्यामुळे वापरकर्ते सुद्धा उत्सुकतेने कंपनीकडून मिळणाऱ्या घोषणांची वाट पाहत आहेत.
पहिलाच टॅबलेट असल्यामुळे Infinix बाकी ब्रँडसोबत असलेल्या आपल्या स्पर्धेला विसरू शकत नाही. त्यामुळे अंदाजे या टॅबलेटची किंमत ही 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते, जो सर्वसामान्यांना परवडणारा असेल. Infinix XPad ची वैशिष्ट्ये.
Infinix XPad चा डिस्प्ले हा 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत 11 इंचाचा FHD डिस्प्ले असणार आहे, ज्याच्या चहूबाजूला सममितीय आणि अरुंद अशा बेजल्स लावण्यात आल्या आहेत. Infinix XPad हा टॅबलेट देखील MediaTek Helio G99 Ultimate या चिपसेटचे समर्थन करणारा असेल असा अंदाज आहे, जे TSMC N6 चिपवर आधारित आहे. हा प्रोसेसर XPad वर इंटेलिजेंट डिस्प्ले सिंक आणू शकतो जो या टॅबलेटच्या उर्जा कार्यक्षमतेला उच्च पातळीवर नेण्यात यशस्वी होईल.
Infinix XPad या टॅबलेटची रॅम ही 4GB इतकी असून यामध्ये 128GB आणि 256GB असे दोन स्टोरेज प्रकार पडू शकतात. या टॅबलेटचा प्राथमिक कॅमेरा हा 12 मेगापिक्सलचा असून 8 मेगापिक्सल दुय्यम सेन्सर सोबत LED फ्लॅश सुध्दा बसविण्यात आला आहे. Infinix XPad कदाचित Android 14 var आधारित XOS कस्टम स्किन ऑफ द बॉक्सचे देखील समर्थन करू शकतो.
Infinix XPad हा टॅबलेट फ्रॉस्ट ब्लू, स्टेलर ग्रे, टायटन गोल्ड या तीन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.