प्रीपेड यूजर्सना एअरटेलच्या ऑल-इन-वन ओटीटी पॅकमध्ये 279 रुपयांचे दोन प्लॅन समाविष्ट आहेत.
Photo Credit: Reuters
एअरटेलच्या नवीन ऑल-इन-वन ओटीटी प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये चार प्लॅन समाविष्ट आहेत
Bharti Airtel कडून भारतात प्रिपेड युजर्स साठी नवे ओटीटी रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करण्यात आले आहेत. नव्या रिचार्ज प्लॅन मध्ये 25 पेक्षा जास्त स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस दिला जाणार आहे. एंट्री लेव्हल प्लॅन Rs. 279 आहे. त्याची एका महिन्याची मुदत आहे. यामध्ये Netflix, Jio Hotstar, Zee5, आणि SonyLiv चा अॅक्सेस मिळणार आहे. टेलिकॉम कंपनीकडून Rs. 598 आणि Rs. 1,729 चा entertainment pack मिळणार आहे. ज्याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आणि 84 दिवसांची आहे. हा प्लॅन अनलिमिटेड 5G data आणि अनलिमिटेड कॉल्स सह मिळणार आहे.Airtel All-in-One OTT Entertainment Packs चे फायदे,एअरटेल कडून नवे All-in-One OTT Entertainment Packs जारी करण्यात आले आहेत. हे प्रिपेड युजर्स साठी आहेत. यामध्ये 279 रुपयांचे दोन प्लॅन, 598 रुपये आणि1729 रुपयांच्या पर्यायांसह उपलब्ध आहेत. या नवीन प्लॅनमध्ये Netflix, Jio Hotstar, Zee5, SonyLiv, Lionsgate Play, AHA, Sun Nxt, Hoichoi, ErosNow, आणि ShemarooMe, वापरता येणार आहे. हे 16 हून अधिक भाषांमध्ये interactional आणि regional content आणि एकाच सबस्क्रिप्शनमध्ये पर्यायी अमर्यादित 5G data देते.
Airtel च्या 279 रुपयांच्या नवीन रिचार्ज प्लॅनची वैधता एक महिन्याची आहे. या प्लॅनमध्ये Netflix Basic, Zee5, Jio Hotstar, आणि Airtel Xstream Play Premiumचे सबस्क्रिप्शन मिळते. एअरटेलने म्हटले आहे की ग्राहकांना या पॅकसह 750 रुपयांच्या विविध लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळेल.
कंपनी 279 रुपयांचा प्रीपेड कंटेंट-ओन्ली पॅक देखील देत आहे ज्याची वैधता एक महिना आहे. Netflix Basic, Zee5, Jio Hotstar, आणि Airtel Xstream Play Premiumच्या अॅक्सेस व्यतिरिक्त, 279 रुपयांचा प्रीपेड प्लॅन एका महिन्यासाठी 1 जीबी डेटा देतो.
एअरटेलचा 598 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन अमर्यादित 5G डेटा आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सेवा देतो. ज्यामध्ये समान ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस समाविष्ट आहे. हा प्लॅन 28 दिवसांची वैधता देतो. शेवटी, 1729 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अमर्यादित 5जी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि समान ओटीटी फायदे देतो, परंतु 84 दिवसांची वैधता देतो.
एअरटेलच्या या घोषणेचा परिणाम आज Indian equity market मध्ये दिसून आला आहे. आज शेअर बाजारात Bharti Airtel वधारलेला होता. 0.56% वाढून तो Rs 1,854.10 वर ट्रेड करत होता. 10.30 रूपयांचा फायदा झाला होता.
जाहिरात
जाहिरात
Microsoft Announces Latest Windows 11 Insider Preview Build With Ask Copilot in Taskbar, Shared Audio Feature
Samsung Galaxy S26 Series Specifications Leaked in Full; Major Camera Upgrades Tipped