Vodafone Idea त्यांच्या Rs. 199, Rs. 179 च्या निवडक प्लॅन्स मध्ये अधिकचे फायदे देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा नाही.
Photo Credit: Reuters
व्होडाफोन आयडियाचा १९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांची वैधता आहे
Vodafone Idea (Vi) ही भारतातील आघाडीची टेलिकॉम सर्व्हिस प्रोवायडर आहे. आता वी आय कडून त्यांच्या लोकप्रिय 199 आणि 179 रूपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या निवडक ग्राहकांना स्पेशल ऑफर दिली जाणार आहे. अद्याप वी आय कडून त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही पण रिपोर्ट्स च्या माहितीनुसार, काही निवडक ग्राहकांसाठी आता वी आय काही मोठे फायदे जाहीर करणार आहेत. 199 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह मिळत असलेल्या 2 जीबी डेटापेक्षा दररोज 1 जीबी अधिकचा डेटा मिळू शकतो. शिवाय, 179 रुपयांच्या रिचार्जवर वीआय आता अधिक फायदे देखील देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
TelecomTalk च्या माहितीनुसार, Vi च्या 199 रूपयांच्या प्रीपेड प्लॅन मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 2GB रोजचा डेटा, 300 एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता आहे. त्यामध्ये आता 1 जीबीची वाढ होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना एकूण 3 जीबी डेटा मिळेल. 28 दिवसांच्या कालावधीत एकूण डेटा कोटा 84 जीबी पर्यंत वाढवला जाऊ शकतो.
199 च्या प्लॅनप्रमाणे, 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता 24 दिवसांवरून 28 दिवसांपर्यंत वाढवून चार अतिरिक्त दिवसांनी वाढवण्यात आल्याचे म्हटले जाते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस, 1 जीबी डेटा उपलब्ध आहे, जरी डेटा वाढीव वैधता कालावधीत समाविष्ट नसल्याची माहिती आहे.
प्रीपेड सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढत असताना या टार्गेटेड ऑफर्स येत आहेत. भारती एअरटेलने नुकतीच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स देणारा 189 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे, ज्यामुळे तो मार्केट मधील सर्वात स्वस्त अमर्यादित कॉलिंग प्लॅन बनला आहे. वाढत्या स्पर्धात्मक दबावादरम्यान ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी Vi चे वाढीव फायदे एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकतात.
Vi ने अलीकडेच कर्नाटकातील म्हैसूर मध्ये 5G सेवा सुरू करण्यास सुरुवात केली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार शहरातील 5G-सक्षम स्मार्टफोन असलेले ग्राहक आता एका introductory offer चा भाग म्हणून अमर्यादित 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. व्होडाफोन आयडियाने 5G रोलआउटसाठी सॅमसंगसोबत भागीदारी केली आहे आणि कर्नाटकमध्ये अतिरिक्त स्पेक्ट्रम तैनात करून नेटवर्क कव्हरेज वाढवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.
वीआय च्या या मर्यादित काळातील ऑफर फक्त Vi मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध आहेत आणि सर्व यूजर्ससाठी उपलब्ध नसतील. कंपनीने अधिकृतपणे पात्रता निकष जाहीर केलेले नसले तरी, ऑफर काही विशिष्ट यूजर्ससाठी मर्यादित असल्याचे दिसून येते आणि प्रदेश किंवा दूरसंचार मंडळानुसार बदलू शकतात.
जाहिरात
जाहिरात