Photo Credit: Reuters
Vodafone Idea ने तिसऱ्या आर्थिक तिमाहीत 4,000 हून अधिक अद्वितीय ब्रॉडबँड टॉवर्स जोडले
Vodafone Idea (Vi) कडून मंगळवारी कमर्शिअल स्वरूपात भारतात 5 जी सर्व्हिस लॉन्च करण्या बाबत घोषणा करण्यात आली आहे. telecom operator कंपनी च्या माहितीनुसार Q3 2024-25 report मध्ये पहिल्यांदा मार्च महिन्यात ही सेवा मुंबई मध्ये दिली जाईल. एप्रिल महिन्यापर्यंत पुढे ही सुविधा चर अन्य शहरांमध्ये दिली जाणार आहे. डिसेंबर 2024 मध्ये Vi कडून 19 सर्कल्स मध्ये 5 जी सेवा सुरू केली. मात्र त्यावेळी ती कमर्शिअल रोलआऊट नव्हती. एअरटेल आणि जिओ कडून 5 जी सेवा 2022 मध्येच आली आहे.
आर्थिक वर्ष 2024-25, च्या तिसर्या तिमाही रिपोर्ट्सनुसार Vi देशात 5जी सेवेची कमर्शिअल रोल आऊट सेवा देण्याचा मानस व्यक्त केला आहे. मुंबई पाठोपाठ ही सेवा बेंगलूरू, चंदीगड, दिल्ली आणि पटणा मध्ये एप्रिल 2025 मध्ये मिळणार आहे. अद्याप अन्य कोणत्या शहरांत 5जी सेवा मिळेल याची माहिती कंपनीने दिलेली नाही.
कंपनीचे CEO Akshaya Moondra यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तिमाहींमध्ये सेवा अधिकाधिक वाढावी या हेतूने गुंतवणूक आणि capex deployment ची क्षमता वाढवण्याकडे आमचं लक्ष असणार आहे. सध्या टप्प्याटप्प्याने 5 जी सेवा दिली जाईल.
5जी सेवा देण्यासोबत Vi कडून अधिकाधिक ठिकाणी 4जी चे युजर्सही वाढवण्याकडे लक्ष असेल असे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार त्यांनी मार्च 2024 पर्यंत 1.03 बिलियन युजर्स मिळवले आहेत. डिसेंबर 2024 पर्यंत यामध्ये 41 मिलियन्सची वाढ झाली असून त्यांचा आकडा 1.07 बिलियन पर्यंत पोहचला आहे.
दूरसंचार ऑपरेटरने देखील त्यांची 4G सब्सस्क्रायबर्स FY24 मध्ये 125.6 दशलक्ष वरून Q3 FY25 च्या शेवटी 126 दशलक्ष पर्यंत वाढवली. दूरसंचार ऑपरेटरने नोंदवले की डिसेंबर तिमाहीत त्यांची एकूण ग्राहक संख्या 199.8 दशलक्ष होती, जी मागील आर्थिक वर्षातील त्याच तिमाहीत 215.2 दशलक्ष होती, ज्यात 15.4 दशलक्षची घट नोंदवली गेली.
Vi ने अहवाल दिला की Q2 मध्ये average revenue per user हा 166 रूपये होता. Q3 मध्ये तो Rs. 173 झाला. म्हणजे 4.7% वाढ झाली आहे. ही वाढ टॅरिफ वाढ आणि युजर्सनी जास्त किमतीच्या योजनांची निवड केल्यामुळे झाली, असे कंपनीने म्हटले आहे.
दूरसंचार ऑपरेटरने या तिमाहीत 4,000 हून अधिक अद्वितीय ब्रॉडबँड टॉवर्सपर्यंत आपली उपस्थिती वाढवली. विलीनीकरणानंतर एका तिमाहीत ही सर्वात मोठी वाढ असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
जाहिरात
जाहिरात