Apple iPhone 17 Air च्या लॉन्चपूर्वी समोर आले अपडेट्स
Apple चा बहुप्रतिक्षित ‘Awe Dropping' इव्हेंट 9 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता (IST) सुरू होणार आहे. या लाँच इव्हेंटचे मुख्य आकर्षण iPhone 17 सिरीज आहे. यामध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max लॉन्च होणार आहे. iPhone 17 Air सध्या सर्वाधिक चर्चेत असून तो मागील वर्षीचा iPhone 16 Plus मॉडेल बदलून Apple चा आतापर्यंतचा सर्वात स्लिम iPhone ठरण्याची शक्यता आहे.