इटलीतील मिलान शहरामध्ये नुकत्याच झालेल्या OnePlus च्या एका कार्यक्रमात, कंपनी ने OnePlus Watch 2R सुद्धा लॉन्च केले आहे. ह्यावेळी OnePlus च्या जुन्या घड्याळांच्या तुलनेत स्टेनलेस स्टील ऐवजी कंपनी ने ॲल्युमिनियमचे घड्याळ बनविण्यास प्राधान्य दिले. त्याचा मुख्य फायदा असा झाला की आता घड्याळाचे वजन फक्त 56 ग्रॅम इतकंच आहे. जाणून घेऊया, ह्या घड्याळाची किंमत, त्यावर उपलब्ध ऑफर्स आणि त्याची वैशिष्टये काय आहेत.
OnePlus Watch 2R ची वैशिष्टये
• OnePlus Watch 2R ची बॅटरी 500 mAh ची असून 48 तास ते 12 दिवसांपर्यंत चालू शकते. म्युझिक प्लेबॅक साठी 32GB स्टोरेजच्या क्षमतेसोबत ह्या घड्याळाचे वजन फक्त 59 ग्रॅम आहे.
• OnePlus चे हे घड्याळ पाणी प्रतिरोधक क्षमतेसोबतच ब्लूटूथ कॉलिंग साठी ह्यात मायक्रोफोन आणि स्पीकर सुद्धा आहेत.
• हृदयाच्या गतीचे आणि शरीरातील ऑक्सिजनच्या कमी जास्त होणाऱ्या प्रमाणावर लक्ष ठेवणाऱ्या सेन्सर सोबत 6 वेगवेगळे सेन्सर ह्या घड्याळामध्ये उपलब्ध आहेत.
• तुमच्या दिवसभराच्या झोप, व्यायाम आणि चालणे अशा सर्व हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ते सक्षम आहे.
• OnePlus Watch 2R मध्ये स्नॅपड्रॅगन W5 आणि BES 2700 ह्या प्रोसेसर सोबत 1.43 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.OnePlus Watch 2R ची किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स
OnePlus Watch 2R हे घड्याळ गनमेटल आणि गडद हिरवा अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत 17,999 रुपये आहे. OnePlus च्या अधिकृत वेबसाइट सोबत, Amazon, Myntra आणि Flipcart, OnePlus चे ॲप्लिकेशन आणि काही निवडक स्टोअर्स मध्ये हे घड्याळ 20 जुलै पासून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
जर तुमच्याकडे ICICI बँक किंवा OneCard हे, क्रेडिट कार्ड असतील तर ह्या घड्याळावर तुम्हाला 31 जुलैपर्यंत 1000 रुपयांची सूट मिळेल.
7 ऑगस्ट पर्यंत Flipcart वर विद्यार्थ्यांना 1000 रुपयांची तर OnePlus च्या वेबसाइट आणि ॲप्लिकेशन वर 500 रुपयांची सवलत विद्यार्थी कूपन द्वारे देण्यात येत आहे.
RCC च्या सदस्यांना OnePlus ची वेबसाइट आणि ॲप्लिकेशन वर 7 ऑगस्ट पर्यंत 1000 रुपयांच्या कूपनचा लाभ घेता येणार आहे.