Photo Credit: Huawei
Huawei watches मध्ये यंदा डिझाईन, बॅटरी लाईफ आणि फीचर्सचा उत्तम मिलाफ पाहता येणार आहे. यंदा Huawei watches मध्ये दमदार अशी TruSense health monitoring system आहे. ज्यामुळे हे घड्याळ बनलं आहे. Huawei Watch GT 5 Pro नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. Barcelona मध्ये हा लॉन्च झाला आहे. हे घड्याळ 46mm आणि 42mm या साईझ मध्ये उपलब्ध होणार आहे. हे घड्याळ अनुक्रमे titanium alloy आणि सिरॅमिक बॉडी मध्ये उपलब्ध असणार आहे. Huawei Watch GT 5 Pro ला IP69K certification देण्यात आलं आहे. या घड्याळामध्ये AMOLED screen आहे. तर घड्याळामध्ये 100 स्पोर्ट्स मोड आहे. Huawei Watch GT 5 Pro ची बॅटरी सामान्य वापर केल्यास 14 दिवसांपर्यंत राहू शकते.
Huawei Watch GT 5 Pro ची किंमत EUR 330 पासून सुरू होत आहे. ही किंमत सुमारे भारतीय रूपयांमध्ये 34 हजार रूपये आहे. 46mm चं व्हर्जन हे काळ्या आणि टिटॅनियम फिनिश मध्ये उपलब्ध आहे. तर 42mm व्हेरिएंट हे सिरॅमिक व्हाईट आणि व्हाईट शेड मध्ये उपलब्ध असणार आहे.
Huawei Watch GT 5 Pro हे घड्याळ 42mm आणि 46mm मध्ये AMOLED डिस्प्ले सह 466 x 466 pixels रिझॉल्युलेशन मध्ये उपलब्ध असणार आहे. लहान व्हर्जन मध्ये सिरॅमिक बॉडी आहे. तर मोठ्या व्हेरिएंट मध्ये टिटॅनियम अलॉय बॉडी आहे. दरम्यान डिस्प्ले वर sapphire glass coating आहे. तर या घड्याळामध्ये 5 एटीएम रेटिंग असलेले वॉटर रेसिस्टंट्स आहे. IP69K certification देखील असणार आहे. यामुळे घड्याळ्याला गरम पाण्याच्या स्प्रे पासूनही धोका नाही आणि घड्याळ्याच्या कोटिंग मुळे खार्या पाण्यातही स्क्रॅच पडण्याचा धोका नाही.
हेल्थ आणि फीटनेस ट्रॅकिंग देखील या Huawei Watch GT 5 Pro मध्ये असणार आहे. यामध्ये हार्ट रेट, स्लीप ट्रॅकिंग, ईसीजी अॅनलाईज ऑप्शन आहे. यामध्ये असलेला सेन्सर accelerometer, ambient light sensor, barometer, depth sensor, ECG sensor, gyroscope, magnetometer, optical heart rate sensor,आणि temperature sensor सह आहे. या घड्याळामध्ये 100 स्पोर्ट्स मोड आहेत. तर गोल्फ कोर्सेस मॅप आहे.
Huawei Watch GT 5 Pro मध्ये Sunflower Positioning System आहे. याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने विविध अॅक्टिव्हिटी ट्रॅक करता येऊ शकते. स्मार्टवॉच मध्ये बॅटरी 14 दिवस चालणार आहे. या स्मार्टवॉचला वायरलेस चार्जिंगचा पर्याय असणार आहे. हे स्मार्टवॉच Huawei Health app सोबत पेअर करता येणार आहे.
46mm व्हेरिएंटचं वजन 53 ग्राम असणार आहे तर 42 mm व्हेरिएंट हे थोडं हलकं आहे. त्याचं वजन 44 ग्राम आहे.
जाहिरात
जाहिरात