Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे

Nothing Headphone (1) ची किंमत 21,999 रुपये आहे. लाँचच्या दिवशी खास किंमतीत म्हणजे 19,999 रूपयांमध्ये हेडफोन्स खरेदी करता येणार आहे.

Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे

नथिंग हेडफोन १ काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे

महत्वाचे मुद्दे
  • Nothing Headphone (1) हे कंपनीचे पहिले वहिले over-ear headphones आहेत
  • The Nothing Headphone (1) हा पांढऱ्या आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध असतील
  • 15 जुलै 2025 पासून हेडफोन्स ऑनालाईन, ऑफलाईन आकर्षक ऑफर्स सह विक्रीसाठी ख
जाहिरात

Nothing ने नुकतेच त्यांच्या प्रोडक्ट फॅमिली मध्ये Nothing Headphone 1 चा समावेश केला आहे. बहुप्रतिक्षित Nothing Phone 3 सोबत हे हेडफोन्स सादर केले आहेत. हेडफोनचे स्टायलिश डिझाईन, कानावर न येणारे वायरलेस हेडफोन्स जगात काही मोजक्या बाजारपेठांमध्ये देखील सादर करण्यात आले आहेत, जे ब्रँडच्या सिग्नेचर पारदर्शक डिझाइन आणि user-focused features सह आहेत. दरम्यान Nothing चे हे पहिले वहिले over-ear headphones आहेत. यामध्ये 40 mm dynamic driver, high linearity suspension चे बिल्ड असलेले आणि 8.9 mm PU surround आहेत. या हेडफोन्सचे अधिक सविस्तर स्पेसिफिकेशन्स आणि किंमती नक्की जाणून घ्या.The Nothing Headphone (1) ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सThe Nothing Headphone (1) मध्ये 42dB hybrid Active Noise Cancellation चे फीचर आहे. जे दर 600 मिलिसेकंदांनी आजूबाजूचे वातावरण स्कॅन करते, रिअल टाइममध्ये जुळवून घेते, तर एक dedicated
wear-detection system दर 1875 मिलिसेकंदांनी इअर-कप आणि इअर कॅनलमधील noise leakage ट्रॅक करते. 360˚ अनुभवासाठी ट्रान्सपरन्सी मोड, अ‍ॅडॉप्टिव्ह बास एन्हांसमेंट, स्पेशियल ऑडिओ आणि डायनॅमिक हेड ट्रॅकिंग देखील आहे.

Headphone (1) हा acoustically engineered च्या बाबतीत KEF च्या भागीदारीत बनवण्यात आला आहे, जो 60 वर्षांहून अधिक काळ उच्च-फिडेलिटी ध्वनीमध्ये तज्ज्ञ असलेला audio pioneer आहे. ड्रायव्हर्स, चेंबर्स आणि सॉफ्टवेअरचे केईएफच्या प्रयोगशाळांमध्ये ऑडिट केले जाते, त्यानंतर एएनसी, ट्रान्सपरन्सी आणि स्पेशियल ऑडिओमध्ये ते रिफाईन केले जातात, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

हेडफोन्समध्ये AI-powered Clear Voice Technology आहे जी तुमचे बोलणे वेगळे करते आणि मागील आवाज कमी करते. सोबतच 28 दशलक्षाहून अधिक real-world scenarios वर प्रशिक्षित आहे. यात LDAC, USB-C ऑडिओ आणि 3.5 मिमी जॅक आहे. HiRes वायरलेस प्रमाणपत्र आणि 24-बिट/96kHz अचूकता आहे.

The Nothing Headphone (1) ची उपलब्धता आणि किंमत

The Nothing Headphone (1) हा पांढऱ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. त्याची किंमत 21,999 रुपये आहे. लाँचच्या दिवशी खास किंमतीत म्हणजे 19,999 रूपयांमध्ये तो उपलब्ध असणार आहे. The Nothing Headphone (1) विक्रीसाठी Flipkart, Flipkart Minutes, Myntra, Vijay Sales, Croma,सह आघाडीच्या रिटेल स्टोअर्स मध्ये उपलब्ध असणार आहे. 15 जुलै 2025 पासून तो विक्रीसाठी उपलब्ध असेल. Nothing कडून हेडफोन खरेदीसाठी 12 महिन्यांचा No-Cost EMI पर्याय उपलब्ध असणार आहे. महत्त्वाच्या बॅंकां मधून हे इएमआय पर्याय मिळणार आहेत. जे ऑफलाईन देखील खरेदीवर मिळतील.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple च्या टीझरने वाढवली ग्राहकांची उत्सुकता; M5 MacBook Pro लॉन्चची तयारी सुरू
  2. Realme GT 8 Series कधी येणार बाजारात? Realme ने पहा केलेली मोठी घोषणा
  3. YouTube ने जारी केले मोठे अपडेटस; आधुनिक Video Player आणि Threaded Replies फीचर जारी
  4. Moto X70 Air होणार चीन मध्ये लॉन्च; अल्ट्रा थीन स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये नवा फोन
  5. Vivo च्या नव्या TWS 5 ईअरबड्समध्ये 60dB ANC, LHDC कोडेक आणि 48 तास बॅटरी
  6. Bose-ट्यून केलेले Noise Master Buds Max भारतात लॉन्च; मिळणार 60 तासांचा प्लेबॅक
  7. AI ची मज्जा अनुभवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये! Nano Banana आता लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये
  8. आता वेबपेज वाचायची गरज नाही; Gemini थेट देणार सारांश
  9. Redmi K90 Pro झाला Geekbench वर स्पॉट? Snapdragon 8 Elite Gen 5 Chipset सह लॉन्च होण्याचा अंदाज; पहा अपडेट्स
  10. Nothing Phone 3a चं आता येणार लाईट व्हर्जन; समोर आले स्पेसिफिकेशन्सचे लीक्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »