OnePlus Buds Pro 3 लवकरच होणार आहेत, भारतात लॉन्च.

अंदाजे OnePlus Buds Pro 3 ची किंमत सुध्दा 13,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते किंवा Pro 2 इतकीच म्हणजेच 12 हजार पासून सुरू होऊ शकते.

OnePlus Buds Pro 3 लवकरच होणार आहेत, भारतात लॉन्च.

Photo Credit: OnePlus

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus Buds Pro 2 ची केस बॉक्सी डिझाइन सोबत येते.
  • हा कार्यक्रम भारतात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता संपन्न होईल.
  • OnePlus Buds Pro 3 दोन ड्रायव्हर्स ठेवण्यासाठी सक्षम आहे.
जाहिरात
OnePlus पुढच्या आठवड्यातच त्यांचे नवीन TWS इयरबड्स म्हणजेच OnePlus Buds Pro 3 भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. TWS वायरलेस इयरबड्सच्या सिरीज मधील OnePlus Buds Pro 2 हे इयरबड्स मागच्याच वर्षी कंपनीने लॉन्च केले होते. ज्याचे उत्तराधिकारी म्हणून हे वायरलेस इयरबड्स लॉन्च होणार आहेत. चला तर मग बघुयात केव्हा लॉन्च होणार आहेत OnePlus Buds Pro 3? काय आहेत त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत. 

OnePlus Buds Pro 3 लॉन्च होण्याची तारीख आणि किंमत.


OnePlus ने आपल्या ट्विटर अकाऊंट वरून म्हणजेच सध्याच्या X अकाऊंट वरून एक पोस्ट शेयर करत OnePlus Buds Pro 3 केव्हा लॉन्च होणार याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टवरून आपल्या लक्षात येते की 20 ऑगस्ट 2024 रोजी भारतात संध्याकाळी 6.30 वाजता हे इयरबड्स लॉन्च करण्यात येतील. याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील हे इयरबड्स लॉन्च होणार असल्याने प्रत्येक ठिकाणी लॉन्च होण्याची वेळ वेगळी आहे. OnePlus आत्तापर्यंतच्या इयरबड्सच्या तुलनेत हे इयरबड्स सर्वोत्कृष्ट ऑडिओ प्रदान करण्यास सक्षम आहेत. 

OnePlus Buds Pro 2 हे मागच्याच वर्षी भारतात लॉन्च झाले होते ज्याची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. अंदाजे OnePlus Buds Pro 3 ची किंमत सुध्दा 13,999 रुपयांपासून किंवा Pro 2 इतकीच म्हणजेच 12 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. 

OnePlus Buds Pro 3 ची वैशिष्ट्ये.


OnePlus Buds Pro 3 हे वायरलेस इयरबड्स 50dB नॉइज कॅन्सलेशनसह बनविण्यात आले आहेत, ज्याचा मुख्य फायदा असा आहे की OnePlus च्या यापूर्वीच्या इयरबड्सच्या तुलनेत यामध्ये व्हॉईस कॉल आणि संवादाची गुणवत्ता आणि वेळ दोन्हीही दुप्पट ठेवण्यात आले आहेत. या इयरबड्सच्या केस मध्ये बसविण्यात आलेली बॅटरी ही एकदा चार्ज केल्यानंतर 43 तासांपर्यंत चालू शकते जी, Pro 2 च्या तुलनेत चार तास जास्त चालू शकते. त्यासोबतच OnePlus Buds Pro 3 या इयरबड्स मध्ये बसविण्यात आलेली बॅटरी ही फक्त दहा मिनिटे चार्ज केल्यानंतर 5 तासांचा प्लेबॅक वेळ देण्यास सक्षम आहे. 

या इयरबड्सच्या डिझाइन मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे यात विगन लेदर सोबत प्रीमियम फिनिश देण्यात आले आहे. यामध्ये 11 मिमी वूफर आणि 6 मिमी ट्वीटर आणि LHDC 5.0 कोडेक समर्थनासह ड्युअल ड्रायव्हर सेटअप आणि स्मार्टप्रिक्स सुध्दा बसवले जाऊ शकतात अशी शक्यता काही अहवालामधून समोर येत आहे. 

OnePlus Buds Pro 3 या इयरबड्स मध्ये IP55 बसविण्यात आले आहे जे धूळ आणि पाणी प्रतिरोधक म्हणून काम करते. यामुळे तुम्ही हे इयरबड्स घालून धूळ, पाणी, हलका पाऊस आणि घाम यापासून नक्कीच सुरक्षित ठेऊ शकता.
 

ces_story_below_text

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »