Dolby Laboratories आणणार Dolby Cinema; सिनेमा पाहण्याचा अनुभव होणार अधिकच खास

डॉल्बी सिनेमामध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि डॉल्बी व्हिजन तंत्रज्ञान एकत्रित करून उच्च दर्जाचा चित्रपट पाहण्याचा अनुभव दिला जाईल

Dolby Laboratories आणणार Dolby Cinema; सिनेमा पाहण्याचा अनुभव होणार अधिकच खास

Photo Credit: Pexels/ Bence Szemerey

यावर्षी सुरुवातीला डॉल्बी सिनेमा भारतातील सहा थिएटरमध्ये दाखल होईल.

महत्वाचे मुद्दे
  • डॉल्बी लॅबोरेटरीज भारतात डॉल्बी सिनेमा आणत आहे
  • देशात 6 Exhibitors सोबत भागीदारी
  • डॉल्बी सिनेमा हा उच्च दर्जाचा ऑडिओ आणि व्हिज्युअल अनुभव देईल असा दावा आहे
जाहिरात

Dolby Laboratories कडून भारतामध्ये Dolby Cinema ची घोषणा करण्यात आली आहे. जे येत्या काही महिन्यांत देशातील निवडक थिएटरमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज आहे. ही तंत्रज्ञान कंपनी Dolby Vision द्वारे प्रेक्षकांना visual fidelity देईल तर Dolby Atmos च्या माध्यमातून चांगली ऑडिओ सुविधा देणार आहे. या तंत्रज्ञानामुळे थिएटरमधील अनुभव सुधारण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ग्राहकांना चांगल्या चित्र आणि ध्वनी गुणवत्तेसाठी प्रीमियम भरावा लागेल. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने हैदराबादमध्ये सिनेमासाठी पहिली Dolby-certified post-production facility सुविधा सुरू केली आहे. Dolby ने भारतात डॉल्बी सिनेमा आणण्यासाठी सहा Exhibitors सोबत भागीदारी केली आहे. कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये घोषणा केली की येत्या काही महिन्यांत भारतात डॉल्बी सिनेमा लाँच करण्यासाठी त्यांनी सहा Exhibitors सोबत भागीदारी केली आहे. हे सिटी प्राइड (पुणे), अल्लू सिनेप्लेक्स (हैदराबाद), एलए सिनेमा (त्रिची), एएमबी सिनेमा (बेंगळुरू), ईव्हीएम सिनेमा (कोची) आणि जी सिनेप्लेक्स (उलिक्कल) आहेत.

या अपग्रेडेड थिएटरमध्ये डॉल्बी लॅबोरेटरीजच्या दोन प्रमुख तंत्रज्ञान - Dolby Vision आणि Dolby Atmos चा समावेश केल्याने चित्रपट प्रेक्षकांना फायदा होईल. डॉल्बी व्हिजन मध्ये higher brightness levels सह increased contrast आणि विस्तृत रंग श्रेणी मिळते. दुसरीकडे, Dolby Atmos डायनॅमिक ऑडिओ जोडून व्ह्यूइंग एरियामध्ये ऑडिओ गुणवत्ता सुधारते, ज्यामुळे अधिक immersive experiences मिळतात.

कंपनी Dolby Cinema च्या प्रेक्षकांना चित्रपट निर्मात्याच्या हेतूशी सुसंगत अनुभव देण्याची क्षमता दाखवते आणि डॉल्बी सिनेमाच्या डिझाइनसह एकत्रित केल्यास प्रत्येक सीट "घरातील सर्वोत्तम सीट" देईल असा दावा करते.

"भारतात डॉल्बी सिनेमाचे लाँचिंग हा देशाच्या मनोरंजन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे," असे Michael Archer, VP of Worldwide Cinema Sales and Partner Management, Dolby Laboratories म्हणाले. पहिले डॉल्बी सिनेमा थिएटर 2014 मध्ये उघडण्यात आले आणि तेव्हापासून कंपनीने भारतासह 14 देशांमधील 35 exhibitors सह भागीदारी केली आहे.

जानेवारीमध्ये, अन्नपूर्णा स्टुडिओजच्या भागीदारीत भारतातील पहिली Dolby-certified post-production facility सिनेमासाठी सुरू करण्यात आली. डॉल्बी लॅबोरेटरीजने असेही उघड केले की देशभरात 24 Dolby Atmos theatrical mixing facilities आहेत, ज्या डॉल्बी सिनेमा फॉरमॅटमध्ये कंटेंट तयार करण्यास मदत करतील.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

संबंधित बातमी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple च्या टीझरने वाढवली ग्राहकांची उत्सुकता; M5 MacBook Pro लॉन्चची तयारी सुरू
  2. Realme GT 8 Series कधी येणार बाजारात? Realme ने पहा केलेली मोठी घोषणा
  3. YouTube ने जारी केले मोठे अपडेटस; आधुनिक Video Player आणि Threaded Replies फीचर जारी
  4. Moto X70 Air होणार चीन मध्ये लॉन्च; अल्ट्रा थीन स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये नवा फोन
  5. Vivo च्या नव्या TWS 5 ईअरबड्समध्ये 60dB ANC, LHDC कोडेक आणि 48 तास बॅटरी
  6. Bose-ट्यून केलेले Noise Master Buds Max भारतात लॉन्च; मिळणार 60 तासांचा प्लेबॅक
  7. AI ची मज्जा अनुभवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये! Nano Banana आता लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये
  8. आता वेबपेज वाचायची गरज नाही; Gemini थेट देणार सारांश
  9. Redmi K90 Pro झाला Geekbench वर स्पॉट? Snapdragon 8 Elite Gen 5 Chipset सह लॉन्च होण्याचा अंदाज; पहा अपडेट्स
  10. Nothing Phone 3a चं आता येणार लाईट व्हर्जन; समोर आले स्पेसिफिकेशन्सचे लीक्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »