Photo Credit: JioHotstar
विद्यमान JioCinema आणि Disney+ Hotstar सदस्य त्यांचे सदस्यत्व बदलू शकतील
JioCinema आणि Disney+ Hotstar यांनी मिळून JioHotstar, हा नवा स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आणला आहे. शुक्रवारी तो JioStar कडून लॉन्च करण्यात आला आहे. हा नव्याने बनवलेला प्लॅटफॉर्म सारी कंटेंड लायब्ररी आणणार आहे. दोन्हींचे मर्जिंग झाल्यानंतर सारे शोज आणि सिनेमे यावर पाहता येणार आहेत. यावर अनेक इंटरनॅशल स्टुडिओज देखील येणार आहेत. JioStar हे एक जॉईंट व्हेंचर आहे जे नोव्हेंबर 2024 मध्ये बनवण्यात आले आणि Viacom18 आणि Star India यांचे एकत्रिकरण झाल्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये JioStar joint venture निर्माण झाले आहे.
JioHotstar Streaming Platform च्या प्रेस रीज मध्ये JioStar कडून JioHotstar च्या लॉन्च ची माहिती देण्यात आली आहे. या नव्या प्लॅटफॉर्मवर 300000 तासांचा कंटेंड आहे सोबतच लाईव्ह स्पोर्ट्स कव्हरेज देखील असणार आहे.
दोन्ही प्लॅटफॉर्मचे मिळून आता 50 कोटी पेक्षा अधिक युजर्स आहेत. नव्या प्लॅटफॉर्मला नवा लोगो असणार आहे. हा JioHotstar शब्द असणार आहे. ज्यात 7 पॉईंटेड स्टार असणार आहे.
JioHotstar वर सध्या मोफत कंटेंट पाहता येणार आहे. युजर्सना शोज, सिनेमे आणि लाइव्ह स्पोर्ट्स पाहण्यासाठी सध्या subscription ची गरज नसेल. subscription प्लॅन्स घेऊन युजर्सना अॅड न पाहता थेट कंटेंट पाहता येणार आहे. सोबतच त्यांना higher resolution मध्ये शो पाहता येतील.
सध्या JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे subscriptions असणारे युजर्स आपोआप नव्या प्लॅटफॉर्म वर येतील. JioHotstar subscriptions वर लॉगिन करून ते येऊ शकतात. New subscribers हे 149 रूपये देऊन प्लॅन्स सुरू करू शकतात.
JioHotstar 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. प्रेक्षक सिनेमे, शोज, अॅनिमेशन, डॉक्युमेंटरी, लाईव्ह स्पोर्ट्स इव्हेंट पाहता येणार आहे. यावर काही इंटरनॅशनल प्रिमियर्स होणार आहे. JioHotstar वर Disney, NBCUniversal Peacock, Warner Bros., Discovery HBO, आणि Paramount चा कंटेंट दिसणार आहे. आयपीएल, डब्ल्यूपीएल आणि आयसीसी इव्हेंट्स सारख्या प्रीमियर क्रिकेट स्पर्धांचेही हे व्यासपीठ असेल. तुम्ही प्रीमियर लीग, विम्बल्डन आणि प्रो कबड्डी आणि ISL सारख्या देशांतर्गत लीग देखील पाह.
जाहिरात
जाहिरात