Photo Credit: Netflix
२८ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर 'रिटर्न ऑफ द ड्रॅगन'चा प्रीमियर होणार आहे.
कॉलिवूड च्या Dragon / तेलगू मध्ये Return of the Dragon या नुकत्याच ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तामिळनाडू आणि तेलगू राज्यांमध्ये या सिनेमाने 120 कोटी पेक्षा अधिकची कमाई केली आहे. हा सिनेमा Ashwath Marimuthu यांनी दिग्दर्शित केला असून त्यामध्ये Pradeep Ranganathan मुख्य भूमिकेत आहेत. Anupama Parameswaran आणि Kayadu Lohar देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. AGS Entertainment चा सपोर्ट असलेल्या या सिनेमाने मोठं यश पाहिलं आहे. सिनेमागृहामध्ये तुफान चालल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी वर येण्याची प्रतिक्षा आहे. 35 करोड बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 120 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमावला आहे.
Dragon आणि त्याचं तेलगू व्हर्जन Return of the Dragon हे नेटफ्लिक्स वर 28 मार्चला रीलीज होत आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही सिनेमाचे डिजिटल राईट्स सिनेमा रीलीजपूर्वीच नेटफ्लिक्सने घेतल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमा नेटफ्लिक्स वर आल्यानंतर तो अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.
Dragon च्या ट्रेलर मध्ये या कथेत एका तरुणाची कथा आहे जो त्याच्या आयुष्याचा मार्ग बदलणाऱ्या अनपेक्षित घटनांच्या मालिकेतून काढत असतो. ज्यामध्ये अॅक्शन, विनोद आणि इमोशन यांचे मिश्रण आहे. अश्वथ मारिमुथु यांचे दिग्दर्शन आणि लिओन जेम्स यांचे संगीत यांच्यासह प्रदीप रंगनाथन यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.
सिनेमामध्ये Pradeep Ranganathan मुख्य भूमिकेमध्ये आहे. सोबत Anupama Parameswaran,Kayadu Lohar आहेत. Leon James यांचे संगीत सिनेमाला आहे.
बॉक्स ऑफिसवर 120 कोटींपेक्षा जास्त कमाई करून, या चित्रपटाने व्यावसायिक यशात आपले स्थान मजबूत केले आहे. त्याचे IMDb रेटिंग 8.3/10 आहे.
जाहिरात
जाहिरात