Photo Credit: ZEE5
१ मार्च २०२५ पासून Zee5 वर संक्रांतिकी वास्तुनाम स्ट्रीम होत आहे
Sankranthiki Vasthunna सिनेमागृहानंतर आता डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा Anil Ravipudi यांनी दिग्दर्शित केला असून Dil Raju त्याचे निर्माते आहेत. या सिनेमामध्ये Daggubati Venkatesh हा मुख्य कलाकार आहे. Sankranthiki Vasthunna हा सिनेमा 1 मार्च 2025 दिवशी Zee5 वर प्रिमियर होणार आहे. संक्रांती स्पेशल म्हणून हा सिनेमा रिलीज झाला होता. प्रेक्षकांनी थिएटर मध्ये या सिनेमाला मोठी पसंती दिली होती.
Sankranthiki Vasthunnam हा सिनेमा Zee5 वर 1 मार्च 2025 पासून उपलब्ध होईल. ओटीटी रिलीज प्रमाणे टेलिव्हिजन प्रिमियर देखील त्याच दिवशी होणार आहे. झी 5 ने सिनेमाचे डिजिटल राईट्स मिळवले आहेत. त्यासाठी 30 कोटीचा व्यवहार झाला आहे.
Sankranthiki Vasthunnam च्या ट्रेलर मध्ये कॉमेडी, नाट्य आणि कुटुंबकेंद्रित मनोरंजनाचे मिश्रण दिसून येते. एक जिवंत घराणेशाही आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी संघर्ष याभोवती चित्रपट फिरतो.
Venkatesh हा Meenakshi Chaudhary आणि Aishwarya Rajesh सोबत मुख्य भूमिकेत आहे. यासोबत तेलगू सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आहेत. सिनेमाचं संगीत Bheems Ceciroleo,यांनी केले आहे. सिनेमामध्ये साऊंडट्रॅकचं विशेष महत्त्व आहे. Dil Raju यांनी Sri Venkateswara Creations सोबत सिनेमाची निर्मिती केली आहे.
जगभरात सिनेमाने 184 कोटी कमावले आहेत. सिनेमाचं ग्रॉस कलेक्शन फक्त तेलगू सिनेसृष्टीत 300 कोटी आहे. Sankranthiki Vasthunnam सिनेमाबरोबर Daaku Maharaaj आणि Game Changer सिनेमे रीलीज झाले होते. मात्र तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. कलाकारांचे अभिनय, सिनेमाचा स्क्रीनप्ले प्रेक्षकांना खिळवुन ठेवणारा आहे.
चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस वरील यशानंतर, दिल राजू आधीपासूनच हिंदी रीमेकवर काम करत आहे, अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारण्यास स्वारस्य दाखवले आहे अशी चर्चा सुरू आहे. या बातमीची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
जाहिरात
जाहिरात