दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान इंटरनेटशिवाय संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या Bitchat अॅपवर केंद्र सरकारने कारवाई सुरू केली आहे.
CJP आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय! जॅक डोर्सीच्या Bitchat अॅपवर GitHub ला कारवाईचे आदेश
दिल्लीतील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने GitHub ला जॅक डोर्सी यांच्या Bitchat या ऑफलाइन मेसेजिंग अॅपशी संबंधित रिपॉझिटरीज हटवण्याचे किंवा त्यावरील प्रवेश बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील Indian Cyber Crime Coordination Centre (I4C) ने जारी केल्याची माहिती समोर आली आहे.
Bitchat हे असे मेसेजिंग अॅप आहे जे मोबाइल इंटरनेट, Wi-Fi किंवा कोणत्याही केंद्रीय सर्व्हरशिवाय ब्लूटूथ मेष (Bluetooth Mesh) तंत्रज्ञानाद्वारे काम करते. त्यामुळे इंटरनेट सेवा बंद असतानाही जवळपास असलेले वापरकर्ते एकमेकांशी संपर्क साधू शकतात. आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा खंडित झाल्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी या अॅपचा वापर केल्याचे वृत्त आहे.
सरकारच्या नोटिसीनुसार, Bitchat चे विकेंद्रीकृत (Decentralised) स्वरूप, वापरकर्त्यांची नोंदणी नसणे आणि केंद्रीय लॉगिंगची सुविधा नसल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांसाठी तपास आणि अधिकृत देखरेख (Lawful Interception) कठीण होऊ शकते. तसेच अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर दहशतवादी, संघटित गुन्हेगारी गट, सायबर गुन्हेगार किंवा देशविघातक घटकांकडून होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जॅक डोर्सी यांनी X (पूर्वीचे Twitter) वर सरकारची कथित नोटीस शेअर करत, "भारत सरकारला Bitchat सारखी तंत्रज्ञाने आवडत नाहीत आणि ती हटवू इच्छित आहे," अशी प्रतिक्रिया दिली.
या प्रकरणामुळे राष्ट्रीय सुरक्षा, डिजिटल गोपनीयता आणि विकेंद्रीकृत तंत्रज्ञानावरील नियंत्रण यावर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹62,479
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹36,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999