Photo Credit: Apple
सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी Apple ने त्यांच्या एका कार्यक्रमात iPhone 16 ही त्यांची मालिका लॉन्च केली आहे. या मालिकेतील दोन महत्वाचे स्मार्टफोन म्हणजेच iPhone 16 आणि iPhone 16 Plus सुध्दा या कार्यक्रमात लॉन्च झाले आहेत. या स्मार्टफोन मध्ये Apple चे स्वत:चे AI म्हणजेच Apple Intelligence त्यासोबतच ॲक्शन बटन आणि कॅमेरा कंट्रोल बटन सुध्दा देण्यात आले आहेत. त्यासोबतच जाणून घेऊयात काय आहेत iPhone 16 आणि iPhone 16 Plus ची किंमत, वैशिष्ट्ये आणि उपलब्धता.
भारतामध्ये iPhone 16 च्या 128 GB स्टोरेज प्रकाराची किंमत 67,100 रुपयां पासून सुरू होत असून समान स्टोरेज प्रकारामध्ये iPhone 16 Plus ची किंमत 75,500 रुपये इतकी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 512 GB या स्टोरेज प्रकारामध्ये आणि काळा, गुलाबी, निळा, अल्ट्रमारीन तसेच सफेद रंगामध्ये देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 13 सप्टेंबर पासून प्री ऑर्डर देखील करू शकता. त्यासोबतच कंपनीकडून 20 सप्टेंबर 2024 पासून विक्री सुरू करण्यात येणार आहे.
iPhone 16 हा स्मार्टफोन iOS 18 वर चालतो. तसेच यामध्ये 3nm octa-core A18 सुध्दा बसविण्यात आली आहे, जी 6-core CPU, 5-core GPU आणि 16-core neural engine या वैशिष्ट्यांनी समर्थित आहे. हे स्मार्टफोन Apple Intelligence या ॲपलच्या AI प्रणालीचे सुध्दा समर्थन करतात. यामध्ये 6.1 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले सुध्दा बसविण्यात आला आहे, ज्याची कमाल तेजस्विता 2000 nits पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. या स्मार्टफोनला IP68 रेटिंग सुध्दा प्राप्त आहे.
iPhone 16 Plus या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले बसविण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे सर्वात विशेष असे वैशिष्टय म्हणजे iPhone 15 pro मध्ये देण्यात आलेले ॲक्शन बटन कॅमेरा कंट्रोल बटन देखील देण्यात आले आहे.
iPhone 16 आणि iPhone 16 Plus या दोन्ही स्मार्टफोनचा कॅमेरा समान आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा 2x झूम कॅमेरा सेन्सर सोबतच 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि सेल्फी काढण्यासाठी 12 मेगापिक्सलचा कॅमेरा बसविण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात