IndiGo ने २० व्या वर्धापन दिनानिमित्त २०,००० मोफत विमान तिकिटांची ऑफर सुरू केली आहे.
देशातील सर्वात मोठी एअरलाइन IndiGo ने आपल्या सेवेला 20 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने कंपनीने प्रवाशांसाठी खास ऑफर जाहीर केली असून, त्याअंतर्गत 20,000 देशांतर्गत फ्लाइट तिकिटांचे भाडे मोफत केले जाणार आहे. मात्र, तिकीट मोफत दिले जाणार नाही, तर निवडलेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटाच्या भाड्याचा रिफंड दिला जाईल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.
IndiGo ची ही ऑफर 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2026 दरम्यान केलेल्या देशांतर्गत फ्लाइट बुकिंगवर लागू असेल. या ऑफरचा लाभ फक्त IndiGo च्या अधिकृत वेबसाइट, मोबाईल अॅप आणि AI व्हर्च्युअल असिस्टंट 6Eskai द्वारे केलेल्या बुकिंगवर मिळेल. कंपनीच्या माहितीनुसार, या कालावधीत बुकिंग करणाऱ्या पात्र ग्राहकांमधून पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल.
निवडलेल्या प्रवाशांना ईमेल आणि WhatsApp द्वारे याची माहिती दिली जाईल. त्यानंतर त्यांना एक सोपा प्रश्न विचारला जाईल. योग्य उत्तर देण्यासाठी तीन संधी दिल्या जातील. योग्य उत्तर दिल्यास संबंधित PNR साठी कमाल 10,000 रुपयांपर्यंत तिकिटाच्या भाड्याचा रिफंड दिला जाईल. रिफंड 3 ते 5 कामकाजाच्या दिवसांत प्रक्रिया करून दिला जाईल.
ऑफर Economy Class आणि IndiGoStretch या दोन्ही प्रकारच्या देशांतर्गत बुकिंगसाठी लागू आहे. यामध्ये वन-वे आणि राउंड ट्रिप या दोन्ही तिकिटांचा समावेश आहे. मात्र, विजेत्यांची निवड पूर्णपणे रँडम पद्धतीने केली जाणार असल्याने ऑफर कालावधीत बुकिंग करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला रिफंड मिळेल, याची हमी नाही.
तसेच, IndiGo ने 4 ऑगस्ट 2006 रोजी दिल्ली-गुवाहाटी-इम्फाळ मार्गावर आपली पहिली व्यावसायिक (Commercial) उड्डाण सेवा सुरू केली होती. आज कंपनी भारताच्या विमान वाहतूक बाजारात सुमारे 51% क्षमतेसह देशातील सर्वात मोठी एअरलाइन बनली आहे.
जाहिरात
जाहिरात