OnePlus Pad 3 मध्ये 13.2-inch 3.4K display चा समावेश आहे
Photo Credit: OnePlus
वनप्लस पॅड ३ फ्रोस्टेड सिल्व्हर आणि स्टॉर्म ब्लू रंगात येतो
OnePlus कडून नुकताच OnePlus Pad 3 हा लेटेस्ट फ्लॅगशीप टॅबलेट लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये 13.2″ 2K 144Hz LCD screen,Snapdragon 8 Elite SoC,16GB LPDDR5T पर्यंत RAM, graphene composite material ची चेंबर्स यांचा समावेश आहे. OnePlus 13s सोबत आलेल्या OnePlus Pad 3 मध्ये पहा काय आहेत फीचर्सOnePlus Pad 3 मधील फीचर्स,OnePlus Pad 3 मध्ये 13.2-inch (3392 x 2400) 3.4K 144Hz display, 315 PPI, up to 900 nits HBM brightness, 144/120/90/60/50/48/30Hz variable refresh rate, 540Hz touch sampling rate चा समावेश आहे. डिस्प्ले ला TÜV Rheinland Eye Care 4.0 certificationआहे. हा टॅब Snapdragon 8 Elite chipset वर चालतो. त्यामध्ये 512GB UFS 4.0 storage चा समावेश आहे. OnePlus Pad 3 च्या मागील बाजूस, 13-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. टॅबलेटमध्ये आठ स्पीकर्स आहेत. डिव्हाइसवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Bluetooth 5.4, Wi-Fi 7 आणि USB Type-C port चा समावेश आहे. टॅबलेट मध्ये फेस अनलॉक फीचरचा देखील समावेश आहे.
या टॅबलेटमध्ये 5.97 mm sleek metal unibody design आहे आणि त्यात 80W SuperVOOC charging सपोर्ट आणि 12,140mAh battery आहे. यामुळे टॅबलेट 92 मिनिटांत 100% पर्यंत चार्ज होऊ शकतो आणि 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 18% बॅटरी मिळते. अपग्रेड केलेल्या कीबोर्डमध्ये आता मोठे, अंतर असलेले कीकॅप्स आहेत जे पीसी-चा अनुभव देतात, तसेच useful command keys सोबतच dedicated AI button चा समावेश आहे.
OnePlus Pad 3 हा टॅबलेट 19 जूनपासून युरोपमध्ये आणि 8 जुलैपासून उत्तर अमेरिकेत उपलब्ध होईल. 5 जूनपासून प्री-ऑर्डर सुरू झाल्या असून भारतात लवकरच तो Amazon.in, Flipkart, OnePlus.in आणि इतर प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
OnePlus Pad 3 हा भारतामध्ये 12GB + 256GB, 16GB + 512GB RAM आणि storage option सह उपलब्ध असणार आहे. भारतामध्ये OnePlus Pad 3 हा Frosted Silver आणि Storm Blue रंगांमध्ये उपलब्ध असेल. भारतात OnePlus Pad 3 ची किंमत काय असेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,652
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999
BGMI 4.6 Update Set to Arrive on September 16 With Supernatural Midnight Hunters Theme Mode