Redmi Pad 2 मध्ये दमदार फीचर्स; पहा किंमत, ऑफर्स काय?

Redmi Pad 2 ची लॉन्ची किंमत Rs 13,999 पासून सुरू होते. याची विक्री भारतात 24 जून पासून होणार आहे.

Redmi Pad 2 मध्ये दमदार फीचर्स; पहा किंमत, ऑफर्स काय?

Photo Credit: Xiaomi

Redmi Pad २ निळ्या आणि राखाडी रंगात उपलब्ध आहे

महत्वाचे मुद्दे
  • Redmi Pad 2 अधिकृतपणे 24 जूनपासून Amazon, Flipkart, Mi.com आणि अधिकृत रिट
  • Redmi Pad 2 मध्ये MediaTek G100 Ultra processor आहे
  • Redmi Pad 2 मध्ये 9000mAh बॅटरी आहे
जाहिरात

चायनीज स्मार्टफोन ब्रॅन्ड Xiaomi कडून नवा बजेट टॅबलेट Redmi Pad 2 भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Android-based टॅबलेटचं अत्यंत sleek design आहे. यामध्ये 2.5K display आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 5, Bluetooth 5.3 आहे. जबरदस्त बॅटरी आहे. Redmi Pad 2 मध्ये Wi-Fi आणि Cellular variants आहे. Redmi Pad 2 चा आकार पाहता तो 254.58 x 166.04 x 7.36 mm आणि वजन 510 grams आहे. पहा Redmi Pad 2 ची नेमकी फीचर्स काय? किंमत किती आहे?Redmi Pad 2 फीचर्स ,Redmi Pad 2 मध्ये 11-inch 2.5K display आहे. 90Hz refresh rate आहे तर 274 ppi pixel density आहे. डिस्प्ले मध्ये TÜV Rheinland certification असल्याने ब्लू लाईटचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. टॅबलेटचा परफॉर्मन्स पाहता त्यामध्ये MediaTek G100 Ultra processor आहे. त्यामध्ये 8GB रॅम आहे.

Redmi Pad 2 मध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फोटोग्राफी तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

यात Dolby Atmos आणि Hi-Res Audio support सपोर्टसह quad-speaker setup देखील आहे. हे Android-based Xiaomi HyperOS 2 वर चालते, जे Call sync, floating window, gestures, smooth interconnectivity support आणि बरेच काही यासह अनेक नवीन फीचर्स देतात. Redmi Pad 2 मध्ये 9000mAh बॅटरी आहे जी 15W चार्जरला सपोर्ट करते, जी बॉक्ससह येते.

Redmi Pad 2 ची किंमत आणि उपलब्धता घ्या जाणून

Redmi Pad 2 हा 4GB + 128GB (WiFi) variant 13,999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. हाच पॅड 6GB + 128 आणि 8GB + 256GB मध्येही उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे Rs.15999 आणि Rs.17999 आहे. Graphite Gray आणि Mint Green या दोन रंगांमध्ये हा टॅब उपलब्ध आहे. ग्राहकांना Redmi Pad 2 च्या अॅक्सेसरीज देखील खरेदी करता येतील. यामध्ये पेन, ज्याची किंमत 3999 रुपये आहे आणि कव्हर, ज्याची किंमत 1299 रुपये आहे. Xiaomi ने HDFC Bank card with EMI सह 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह लॉन्च ऑफर देखील दिली आहे. Redmi Pad 2 अधिकृतपणे 24 जूनपासून Amazon, Flipkart, Mi.com आणि अधिकृत रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Galaxy S26 सिरीज कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पुन्हा समोर; नवीन लीक्समध्ये पूर्ण सेटअपची समोर आली माहिती
  2. OnePlus 15 नवीन जनरेशन प्रोसेसरसह आला भारतात; 7,300mAh बॅटरी आणि किंमतीचे अपडेट्स आले समोर
  3. itel A90 128GB लिमिटेड एडिशन भारतात लाँच; पहा फोनमध्ये काय आहे खास?
  4. OPPO Reno 15 व Reno 15 Pro भारतात लॉन्चसाठी होतोय सज्ज; पहा कॅमेरा ते रंगांपर्यंतची काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स
  5. Poco F8 Ultra Geekbench वर दिसताच चर्चेला उधाण; स्कोअर पाहून चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता
  6. Vivo X300 सिरीज भारतात लॉन्च होणार लवकरच, Zeiss कॅमेरासह दमदार फीचर्स
  7. Realme Neo 8 होणार पॉवरहाऊस! 8,000mAh बॅटरीसह येऊ शकतो फोन
  8. iPhone 18 Pro Max मध्ये वाढणार वजन आणि जाडी; पहा अपडेट्स
  9. OnePlus चा पुढील स्मार्टफोन देणार गेमिंगसाठी जबरदस्त 240Hz डिस्प्ले अनुभव ? पहा अपडेट्स
  10. iQOO कडून सर्विस डे विशेष घोषणा; ग्राहकांना मिळणार मोफत बॅक केस आणि प्रोटेक्टिव्ह फिल्म
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »