Photo Credit: Reliance
5 सप्टेंबर 2016 रोजी Jio वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. आणि आता नुकताच 2024 मध्ये Jio चा आठवा वर्धापन दिन पार पडला. त्यासोबतच झालेल्या Jio च्या 47 व्या वार्षिक सभेमध्ये कंपनीने नव्या सेवा देखील लॉन्च केला आहेत. आणि आता या वर्धापन दिना निमित्त कंपनीने नवीन रिचार्ज ऑफर्स लॉन्च केल्या आहेत. चला तर मग बघुयात, काय आहेत या नवीन ऑफर्स आणि काय आहेत नवीन Jio Prepaid Plans.
Jio च्या नवीन Jio Prepaid Plans मध्ये तुम्हाला तब्बल 700 रुपयांच्या सेवा अधिक वापरासाठी प्रदान करण्यात येणार आहेत. या अतिरिक्त सेवा उपभोगण्यासाठी फक्त तीन रिचार्जवरच उपलब्ध आहेत, ते Jio Prepaid Plans म्हणजे 899 रुपये, 999 रुपये आणि 3,599 रुपये. 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2024 दरम्यान तुम्ही हे रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यास तुम्हाला त्यासोबत 125 रुपयांचा OTT सबस्क्रिप्शन प्लॅन आणि 10 GB चा डेटा व्हाउचर देण्यात येणार आहे, ज्याची वैधता ही 28 दिवस असणार आहे.
यामध्ये 899 रुपये आणि 999 रुपयांचा रिचार्ज हा त्रैमासिक रिचार्ज असून प्रतिदिन 2 GB डेटा वापरण्यास मिळतो आणि या प्लॅनची वैधता 90 आणि 98 दिवसांची आहे. सोबतच 3,599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा 365 दिवसांचा वार्षिक प्लॅन असून या तिन्ही Jio Prepaid Plans वर 700 रुपयांच्या सेवा उपलब्ध आहेत. सोबतच यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांपर्यंत मोफत Zomato Gold Subscription देखील मिळते. सोबतच AJIO या ऑनलाईन स्टोअरचे मोफत व्हाउचर आणि 2,999 रुपयांच्या खरेदीवर 500 रुपयांची सूट देण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात, रिलायन्स Jio ने नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन ऑफर करणाऱ्या दोन प्रीपेड योजनांच्या किमती वाढवल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, 1,099 रुपये आणि 1,499 रुपये किंमतीच्या या दोन Jio रिचार्ज प्लॅन मध्ये Netflix सदस्यता मोफत देण्यात येते. हे प्लॅन आता अधिकृत Jio वेबसाइटवर अनुक्रमे 1,299 रुपये आणि 1,799 रुपयांमध्ये सूचीबद्ध करण्यात आले आहेत. त्यासोबतच 1,299 रुपयांचा प्लॅन नेटफ्लिक्स मोबाईल सबस्क्रिप्शन प्रदान करते आणि 1,799 रुपयांचा प्लॅन इतर फायद्यांसह नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन प्रदान करते.
आठ वर्षांपूर्वी, हाय-स्पीड डेटा आणि डिजिटल सेवा सर्वांना परवडण्याजोग्या आणि प्रवेशयोग्य बनवून भारताचे डिजिटल रूपांतर करण्याच्या व्हिजनसह Jio लाँच करण्यात आले होते.