Photo Credit: Oppo
Oppo Enco X3 हे नवे इअरफोन्स गुरूवार, 25 ऑक्टोबर दिवशी चीन मध्ये लॉन्च झाले आहेत. यासोबत कंपनीने Oppo Find X8 series चे स्मार्टफोन आणि Oppo Pad 3 Pro देखील लॉन्च केले आहेत. हे इअरफोन OnePlus Buds Pro 3 म्हणून रिब्रॅन्ड करण्यात आले आहे. ते भारतामध्ये ऑगस्ट महिन्यात लॉन्च केले आहेत. नवे Oppo TWS earphones हे Dynaudio सोबत ट्युन केलेले आहेत. त्यात 11mm bass drivers आहेत आणि 6mm tweeters आहेत. यामध्ये dual DAC units आहेत. यामुळे आवाजाची क्षमता सुधारणार आहे. हे इअरफोन 43 तास बॅटरी लाईफ सह येणार आहेत.
Oppo Enco X3 ची चीन मधील किंमत CNY 999 म्हणजे भारतीय रूपयांप्रमाणे 11,800 आहे. तर सध्या Oppo China e-store मध्ये प्री ऑर्डर साठी उपलब्ध आहेत. सध्या स्पेशल प्री सेल किंमत CNY 949 आहे. जी भारतीय रूपयांमध्ये अंदाजे 11,200 रूपये आहे. त्याचं शिपिंग 30 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. काळा आणि ऑफ व्हाईट अशा दोन रंगांमध्ये हे इअरफोन उपलब्ध आहेत.
Oppo Enco X3 यामध्ये in-ear design आहे आणि सिलिकॉन इअर टिप्स आणि राऊंडेड स्टिम्स आहेत. या इअरफोनमध्ये capacitative touch controls आहेत. त्यात पिंच अॅक्शन आणि स्लायडिंग आहे ज्यात आवाज कमी जास्त करता येणार आहे. या मध्ये 11mm bass drivers आहेत. 6mm tweeters आहेत. या इअरफोन मध्ये AI-backed ट्रीपल माईक युनिट्स आहेत ज्यात VPU bone conduction आहे.
Oppo's Enco X3 मध्ये 50dB अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन आहे. या इअरफोनमध्ये Danish loudspeaker मेकर्स Dynaudio कडून ट्युन्ड आहे. यामध्ये IP55 rating आहे ज्यामुळे धूळ, पाण्यापासून संरक्षण होईल.
Oppo च्या माहितीनुसार, Enco X3 earphones मध्ये बॅटरी लाईफ 43 तासांची आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 10 तासांपर्यंत चालते. कनेक्टिव्हिटी साठी Bluetooth 5.4 आहे. LHDC 5.0 audio codec आहे. या इअरफोनच्या प्रत्येक इअरबर्डचं वजन 5.3g आहे.
जाहिरात
जाहिरात