Photo Credit: Xiaomi
Redmi Band 3 चीन मध्ये लॉन्च झाला आहे. हे स्मार्टबॅन्ड 1.47 इंच आयताकृती स्क्रीन असलेले आहे. त्यामध्ये 60Hz refresh rate आहे. तर या स्मार्टवॉचची बॅटरी लाईफ 18 दिवसांची आहे. या स्मार्टवॉच मध्ये अनेक हेल्थ-वेलनेस मॉनिटरिंग फीचर्स आहेत. याच्या मदतीने हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि स्लिप सायकल यावर लक्ष ठेवता येते. हे स्मार्ट वेअरेबल water resistance साठी 5ATM rating आहे. यामध्ये 50 preset sports modes आहेत. तर त्यामध्ये 100 watch faces आहेत. हे स्मार्टवॉच Xiaomi च्या HyperOS वर चालते.
Redmi Band 3 ची ची न मध्ये किंमत CNY 159 आहे म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये सुमारे 1900 रूपये आहे. चीनमध्ये सध्या त्याची विक्री Xiaomi China e-store च्या मार्फतातून होणार आहे. या स्मार्टबॅन्ड मध्ये 5 रंग आहेत. ज्यात काळा, बेज, डार्क ग्रे, हिरवा, गुलाबी आणि पिवळा रंग उपलब्ध आहे.
Redmi Band 3 मध्ये स्क्रीन 1.47 इंच आयताकृती आहे. या स्क्रीन मध्ये 172 x 320 pixels रेझ्युलेशन आहे तर 60Hz refresh rate आहे. स्मार्टवॉच हे 9.99mm जाडीचे आहे तर वजन 16.5g आहे. या घड्याळयात 100 पेक्षा जास्त वॉच फेसेस आहेत.
रेडमी बॅन्ड 3 मध्ये हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजन, स्टेप ट्रॅकर यांचा समावेश आहे. स्मार्ट वेअरेबलच्या मदतीने झोप आणि मासिक पाळी वर देखील लक्ष ठेवता येते. यामध्ये 50 preset sports modes आहेत.
Redmi Band 3 मध्ये 300mAh बॅटरी आहे. सामान्य वापर केल्यास ही बॅटरी 18 दिवस चालू शकते. अति वापरामध्ये हे स्मार्ट बॅन्ड 9 दिवस चालू शकते. 2 तासामध्ये हे स्मार्ट वॉच 0 ते 100 पर्यंत चार्ज होते. मॅग्नेटिक चार्जिंग होते. Bluetooth 5.3 connectivity आहे. या स्मार्ट बॅन्ड मध्ये WeChat आणि AliPay offline payments देखील चालते.
जाहिरात
जाहिरात