मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी १५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर परस्पर संमतीने विभक्त होण्याची घोषणा केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आदर्श मानल्या जाणाऱ्या जोडप्यांपैकी एक असलेले अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांनी अखेर आपल्या वैवाहिक नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, या चर्चांवर दोघांनीही मौन बाळगले होते. अखेर त्यांनी सोशल मीडियावर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची माहिती दिली.
संयुक्त निवेदनात आदिनाथ आणि उर्मिला यांनी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि परस्पर आदर राखून घेतल्याचे स्पष्ट केले आहे. वैवाहिक नातं संपत असलं तरी एकमेकांबद्दलचा सन्मान कायम राहील, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा असलेल्या मुलगी जिझाच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही मिळून पार पाडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय या कठीण काळात त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती चाहत्यांसह प्रसारमाध्यमांना केली आहे.
आदिनाथ आणि उर्मिलाची पहिली भेट २००६ मध्ये 'शुभमंगल सावधान' चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०११ मध्ये विवाह केला. २०१८ मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी जिझाचे आगमन झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील हे जोडपे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि सोशल मीडियावर एकत्र दिसत असल्याने चाहत्यांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता होती.
गेल्या काही महिन्यांपासून दोघे वेगळे राहत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. मात्र त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. अखेर संयुक्त निवेदनाद्वारे त्यांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला. त्यांच्या या निर्णयानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत दोघांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आदिनाथ कोठारे यांनी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्मिला कानेटकर-कोठारे यांनीही चित्रपट, मालिका आणि कथ्थक नृत्याच्या माध्यमातून स्वतःचा ठसा उमटवला आहे. वैवाहिक नातं संपत असलं तरी पालक म्हणून मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोघेही एकत्र काम करतील, असा संदेश त्यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹62,479
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹36,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
WhatsApp Reportedly Testing Meta AI-Powered Image Expansion Feature for iPhone