अथर्व सुदामेने सुरू केला ‘माय मराठी’ हा विशेष मराठी टॉक शो.
डिजिटल मनोरंजनाच्या वेगाने बदलणाऱ्या विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अथर्व सुदामेने ‘माय मराठी' या नव्या मराठी टॉक शोद्वारे मराठी संस्कृती, अस्मिता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना एक खास व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. डिजिटल कंटेंट, स्टँडअप कॉमेडी, अभिनय, लेखन आणि सूत्रसंचालन या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी वाटचाल करणाऱ्या अथर्वचा हा नवा उपक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
‘माय मराठी' हा केवळ सेलिब्रिटी मुलाखतींचा कार्यक्रम नसून, मराठी माणसांच्या यशस्वी प्रवासामागील संघर्ष, भावना आणि प्रेरणादायी अनुभव उलगडणारा एक भावनिक प्रवास आहे. महाराष्ट्राशी नाळ जुळलेल्या आणि मराठी संस्कृतीशी घट्ट नाते असलेल्या मान्यवरांशी संवाद साधत हा शो प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील अनोळखी पैलूंची ओळख करून देतो.
कार्यक्रमातील ‘मराठी शिलेदार' हा विशेष विभागही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना त्यांच्या कला आणि प्रतिभेला मोठे व्यासपीठ मिळत असून, मराठी कलाविश्वातील नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
अथर्व सुदामे
Photo Credit: अथर्व सुदामे
या शोची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे प्रत्येक भागाच्या शेवटी पाहुण्यांचा भावनिक पद्धतीने सन्मान केला जातो. त्यांच्या जीवनप्रवासाला समर्पित पत्रे किंवा त्यांच्या कलेशी पुन्हा जोडणारे विशेष क्षण प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जातात.
अभिनेता रितेश देशमुख यांच्या उपस्थितीने सजलेल्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता अभिजित सावंत आणि यशराज मुखाटे यांच्यासोबतचा दुसरा भाग प्रदर्शित झाला असून, संगीत, आठवणी आणि मराठी अस्मितेभोवती फिरणारा हा संवाद प्रेक्षकांना भावनिक आणि मनोरंजक अनुभव देत आहे.
‘माय मराठी' हा माझ्यासाठी केवळ एक शो नाही, तर आपल्या मातीशी, भाषेशी आणि संस्कृतीशी जोडणारी भावना आहे. प्रेक्षकांना प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे खरे आणि मनापासूनचे रूप पाहता यावे, तसेच नवोदित कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हीच या कार्यक्रमामागची प्रेरणा असल्याचे अथर्व सुदामे यांनी सांगितले.
‘माय मराठी' हा कार्यक्रम अथर्व सुदामे यांच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत असून, सोशल मीडियावरही त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹64,150
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
Meta Muse AI Agent Arrives on Mac With Support for Complex Tasks: What to Know
WhatsApp Could Bring New Theme Categories and Wallpapers to Android
Mivi One 5G Camera Details Revealed, Mivi Care+ Support Teased Ahead of Launch