‘तुंबाडची मंजुळा’ या बहुचर्चित चित्रपटाला आता पद्मश्री हरिहरन यांच्या सुरांची साथ
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. चित्रपटातील ‘तर्राट' गाण्यानंतर आता पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्या आवाजातील ‘पुन्हा पुन्हा' हे रोमँटिक गीत रसिकांच्या भेटीला येत आहे. हरिहरन यांच्या मधुर आणि भावस्पर्शी आवाजामुळे या गाण्याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हे सुद्धा वाचा :
AI च्या युगात Acer ची मोठी झेप; Aspire X 16, Aspire 18 सादर
भारतीय संगीतविश्वात गेली अनेक दशके आपल्या सुरांची मोहिनी घालणारे हरिहरन हे नाव आजही संगीतप्रेमींसाठी तितकेच खास आहे. गझल, चित्रपटगीते आणि भावगीतांमधून त्यांनी निर्माण केलेली वेगळी ओळख आजही कायम आहे. अशा दिग्गज गायकाचा आवाज ‘तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाला लाभल्याने चित्रपटाच्या संगीताला नवी उंची मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘पुन्हा पुन्हा' हे गाणे हरिहरन आणि गायिका निधी हेगडे यांच्या आवाजात साकारले असून प्रेम, विरह, आठवणी आणि भावनांच्या नाजूक छटांनी सजलेले हे गीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल, अशी अपेक्षा आहे.
गाण्याच्या प्रोमोमध्ये दिसणारी दृश्ये आणि त्यावर उमटलेले हरिहरन यांचे सुरेल स्वर प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातात. गाण्याची चाल, शब्द आणि सादरीकरण यांचा सुरेख मेळ साधण्यात आला असून हे गीत केवळ चित्रपटापुरते मर्यादित न राहता संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये कायमचे स्थान मिळवेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमकडून व्यक्त केला जात आहे.
‘तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट रहस्य, विनोद, नातेसंबंध आणि भावनांचा संगम असलेला मनोरंजक प्रवास असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटातील प्रत्येक गाण्याद्वारे कथानकाला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात ‘पुन्हा पुन्हा' हे गीत कथेला भावनिक स्पर्श देणारे महत्त्वाचे गाणे ठरणार आहे. हरिहरन यांच्या आवाजातील खोली आणि भावनांची ताकद या गाण्याला वेगळीच ओळख देत आहे.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,652
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999
BGMI 4.6 Update Set to Arrive on September 16 With Supernatural Midnight Hunters Theme Mode