अमेझॉनने सेलसाठी SBI बँकेशी भागीदारी केली असून, क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून खरेदी केल्यास ग्राहकांना अतिरिक्त 10 टक्के सवलत मिळणार आहे.
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२५ सेलमध्ये २४ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय देखील उपलब्ध आहे
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 काही दिवसांत सुरू होत आहे. हा सेल 23 सप्टेंबरपासून सर्वांसाठी तर 22 सप्टेंबरपासून प्राईम मेंबर्ससाठी सुरू होत आहे. सेलपूर्वीच अनेक ब्रँड्सनी त्यांच्या उत्पादनांवरील सवलती जाहीर करायला सुरुवात केली आहे. गुरुवार, 18 सप्टेंबर दिवशी Lumio कंपनीने आपल्या Vision सीरिज स्मार्ट टीव्ही आणि Arc सीरिज प्रोजेक्टर यांच्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत त्यामुळे टीव्ही अपग्रेड करायचा आहे किंवा प्रोजेक्टर घ्यायचा आहे अशांसाठी ही खरेदीची दमदार संधी आहे.ग्राहकांना या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, इअरफोन, स्मार्टवॉच, हेडफोन, स्पीकर्स आणि होम अप्लायन्सेस यांसारख्या विविध उत्पादनांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. दरम्यान, ॲमेझॉन च्या सेलच्या वेळेस Flipkart देखील Big Billion Days सेल लॉन्च करत आहे. तसेच Zepto आणि Instamart सारख्या प्लॅटफॉर्मवरही अशाच प्रकारचे सेल होणार आहेत.
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 दरम्यान विविध प्रोडक्ट्सवर नियमित सवलती मिळणार आहेत. मात्र खरेदीत अजून जास्त पैसे वाचवायचे असल्यास, ग्राहक बँक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे एकूण खरेदीची किंमत आणखी कमी होईल.
ॲमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल साठी SBI बँकेशी भागीदारी केली असून, SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरून खरेदी केल्यास ग्राहकांना अतिरिक्त 10 टक्के सवलत मिळणार आहे. याशिवाय, निवडक उत्पादनांवर नो-कॉस्ट EMIचा पर्यायही उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवस्थापन सोपे होईल. मात्र, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या वेळी Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वर कोणतीही विशेष कॅशबॅक ऑफर जाहीर केलेली नाही.
Lumio स्मार्ट टीव्ही आणि प्रोजेक्टरवरील सर्वोत्तम ऑफर्स इथे पहा आणि जर तुम्ही नवीन गेमिंग स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल, तर येथे दिलेल्या iQOOवरील सर्वोत्तम डील्स नक्की पाहू शकता.
मॉडेल | लिस्ट प्राईज | सेल्स प्राईज |
Lumio Vision 7 (43-inch) | Rs. 29,999 | Rs. 19,999 |
Lumio Vision 7 (50-inch) | Rs. 34,999 | Rs. 25,999 |
Lumio Vision 7 (55-inch) | Rs. 39,999 | Rs. 29,999 |
Lumio Vision 9 (55-inch) | Rs. 59,999 | Rs. 45,999 |
Lumio Arc 5 | Rs. 19,999 | Rs. 14,499 |
Lumio Arc 7 | Rs. 34,999 | Rs. 29,999 |
जाहिरात
जाहिरात