Photo Credit: Redmi
Xiaomi ने या आठवड्यामध्ये भारतीय बाजारात दोन नवीन टीव्हीची मॉडेल लाँच करून आपली Redmi स्मार्ट फायर टीव्ही सीरीज रीफ्रेश केली आहेत. रेडमी स्मार्ट फायर टीव्ही 4K 2024 सीरीज(Redmi Smart Fire TV 4K 2024 series) भारतामध्ये लॉन्च झाला आहे. हा टीव्ही 43 इंच आणि 55 इंच या दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. दरम्यान हा रेडमी चा पहिलाच 55 इंच टीव्ही आहे. दोन्ही व्हेरिएंट्स मधील स्पेसिफिकेशन सारखीच आहेत. फक्त लक्षात येणारा फरक हा ऑडिओ सिस्टीम मध्ये आहे. 43 इंच मॉडेल हा 24 व्हॉट्स स्पीकर्स सह येणार आहे तर 55 इंच मॉडेल हा 30 व्हॉल्ट्स स्पीकर सिस्टीम सह उपलब्ध आहे. रेडमी स्मार्ट फायर टीव्ही 4K 2024 सीरीज मध्ये इनबिल्ट Alexa voice assistant आहे. या Redmi Smart Fire TV 4K सीरीजचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते Google TV ऑपरेटिंग सिस्टीम ऐवजी इनबिल्ट Alexa व्हॉइस असिस्टंट आणि Fire TV OS सह उपलब्ध होणार आहे. जे आधीच्या Redmi TV मॉडेल्सवर देखील होते मग या स्मार्ट टीव्हीची भारतामधील किंमत काय? सविस्तर स्पेसिफिकेशन काय या तुमच्या मनातील सार्या प्रश्नांची उत्तरं इथे नक्की जाणून घ्या.
भारतामध्ये रेडमी स्मार्ट फायर टीव्ही 4K 2024 23,499 पासून सुरू होतो. 43 इंचाच्या मॉडेल साठी 23,499 मोजावे लागणार आहेत तर 55 इंचाच्या मॉडेल साठी 34,499 रूपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान ICICI Bank credit आणि debit cards वापरणार्यांना 1500 रूपयांची सूट आहे.स्मार्ट टीव्हींची विक्री 18 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. दरम्यान हा स्मार्ट टीव्ही अधिकृत वेबसाईट mi.com आणि फ्लिपकार्ट वरून विकत घेता येऊ शकतो.
Redmi च्या माहितीनुसार, Redmi Smart Fire TV 4K 2024 मधील टीव्ही मध्ये bezel-less design आहे तर 4K HDR display आहे. स्मार्ट टीव्ही मध्ये Motion Estimation, Motion Compensation (MEMC) technology आहे. यामध्ये picture-in-picture mode देखील आहे. यामुळे मल्टीटास्किंग करता येणार आहे.
स्मार्ट टीव्ही मध्ये 64-bit quad-core processor आहे जो 2 जीबी रॅम आणि 8 जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या पर्याय आहे. या फायर टीव्ही इंटिग्रेशन मध्ये युजर्सना सुमारे 12 हजार अॅप्स मिळणार आहेत. ही अॅप्स इनबिल्ट अॅप स्टोअर मध्ये आहेत. यामध्ये Prime Video, Netflix, Disney+ Hotstar, JioCinema सारखी ओटीटी प्लॅटफॉर्म्स मिळणार आहेत. Fire TV OS 7 वर हे दोन्ही स्मार्ट टीव्ही चालणार आहेत.
कनेटीव्हिटीचा विचार करता या Redmi Smart Fire TV 4K मध्ये ब्लू टूथ 5.0, ड्युअल बॅन्ड वायफाय, एअरप्ले 2 आणि मिराकास्ट आहे. यासोबतच Alexa voice assistant असणार आहे. युजर्स टीव्ही आणि सर्च कंटेट बोलून शोधता येऊ शकतो. अलेक्सा च्या मदतीने व्हिडीओ साठी पर्याय मिळू शकतात. तसेच कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट टीव्ही हा अन्य अलेक्साशी जोडलेल्या स्मार्ट अपलायंस साठी सेंट्रल हब म्हणून काम करू शकेल. या सार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हॉईस म्हणजे आवाजानेही नियंत्रण ठेवता येऊ शकते.
जाहिरात
जाहिरात