Amazon Great Summer Sale 2025 मध्ये मिळणार घसघशीत ऑफर्स; पहा काय खास?

अमेझॉन ने HDFC Bank सोबत हातमिळवणी करत क्रेडिट कार्ड्स आणि EMI transactions वर सूट जाहीर केली आहे.

Amazon Great Summer Sale 2025 मध्ये मिळणार घसघशीत ऑफर्स; पहा काय खास?

Photo Credit: Amazon

Amazon Great Summer Sale 2025 आज मध्यरात्री पासून होणार सुरू; पहा सेल मध्ये काय असेल खास

महत्वाचे मुद्दे
  • अमेझॉन प्राईम चे ग्राहक Great Summer Sale 2025 मध्ये 1 मे च्या रात्री 12
  • स्मार्ट टीव्ही आणि प्रोजेक्टरवर 65 टक्के सूट मिळणार
  • अमेझॉन कडून अद्याप सेल कधी संपणार ? याची माहिती देण्यात आलेली नाही
जाहिरात

Amazon Great Summer Sale 2025 आज 1 मे च्या रात्री 12 वाजल्यापासून Amazon Prime members साठी खुला होणार आहे. ग्राहकांना या सेल मध्ये मोठ्या डिल्स आणि ऑफ़र्स, डिस्काऊंट्स मिळणार आहेत. अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह फॅशन, डेकॉर आणि किचन मधील वस्तूंवर घसघशीत सूट मिळणार आहे. अमेझॉन ने HDFC Bank सोबत हातमिळवणी करत क्रेडिट कार्ड्स आणि EMI transactions वर सूट जाहीर केली आहे ग्राहकांना कूपन बेस्ड डिस्काऊंट्स देखील मिळणार आहेत.

Amazon's Great Summer Sale 2025 कधी होणार सुरू?

अमेझॉन प्राईम चे ग्राहक Great Summer Sale 2025 मध्ये 1 मे च्या रात्री 12 वाजल्यापासून खरेदी करू शकतात. तुम्ही प्राईम मेंबर्स नसाल तर तुम्हांला 12 तास थोडं थांबांव लागेल. दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून सार्‍यांसाठी सेल सुरू होईल.

अमेझॉन कडून अद्याप सेल कधी संपणार ? याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्हांला काही खरेदी करायची असेल आणि त्याची किंमत कमी झाली असेल तर स्टॉक संपायच्या आधीच त्याची खरेदी करून टाका.

Amazon Great Summer Sale मध्ये लवकर खरेदीसाठी काय कराल?

Amazon Prime चं तुम्ही subscription घेऊ शकता. भारतामध्ये Amazon Prime साठी प्रति महिना 299 रूपये आहे तर 599 मध्ये तीन महिन्यांसाठी आहे. 1499 रूपये ही वार्षिक फी आहे. नव्या युजर्स साठी 30 दिवसांसाठी फ्री ट्रायल देखील आहे.

Prime Lite plan देखील प्रतिवर्ष 799 मध्ये खरेदी करता येऊ शकते. तर 399 प्रतिवर्ष भरून Prime Shopping Edition plan देखील घेऊ शकता. यामध्ये फ्री शिपिंग सोबतच प्राईम मेंबर्सना Prime Video आणि Prime Music चा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.

Amazon Great Summer Sale 2025 मधील डिल्स

ई-कॉमर्स वेबसाइटने एका मायक्रोसाइटद्वारे ऑफरची झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे. Amazon Great Summer Sale 2025 मध्ये स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीजवर 40 टक्के आणि टॅब्लेटवर 60 टक्के सूट देणार आहे. शिवाय, घरगुती उपकरणे, स्मार्ट टीव्ही आणि प्रोजेक्टरवर 65 टक्के सूट असेल. प्रवास बुकिंगवर 40 टक्के सूट दिली जाते.

सेल दरम्यान 43-इंचाचा Xiaomi स्मार्ट टीव्ही A Pro आणि 55-इंचाचा Sony Bravia 3 Series 4K Ultra HD टीव्हीच्या किमतीत कपात होणार आहे. सेलमध्ये Amazon डिव्हाइसेसवर देखील ऑफर्स आहेत.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »