Photo Credit: Jio
JioFinance app आज (11 ऑक्टोबर) भारतामध्ये लॉन्च झाले आहे. यामुळे आर्थिक व्यवहार सुकर होणार आहेत. ही सेवा Jio Financial Services Limited कडून देण्यात आली आहे. आता देशामध्ये हे अॅप वापरण्यासाठी खुलं केलं जाणार आहे. यामध्ये यूपीआय ट्रान्झॅक्शन केले जाणार आहेत. म्युचल फंड मध्ये मॉनिटरिंग आणि गुंतवणूकीचा पर्याय देणार आहे. बिल देखील भरता येणार आहे. मे महिन्यात ते बीटा व्हर्जन मध्ये दिसणार आहे. JFSL चा दावा आहे 6 मिलियन लोकांनी या सेवेचा फायदा घेण्यास सुरूवात केली आहे.
JFSL च्या माहितीनुसार, JioFinance app आता Google Play Store आणि App Store वर डाऊनलोड साठी उपलब्ध असणार आहे. तर MyJio platform वरून देखील ते वापरता येणार आहे. JioFinance,युजर्स आता यूपीआय पेमेंट हे त्यांचं बॅंक अकाऊंट लिंक करून किंवा QR code स्कॅन करून देखील पूर्ण करू शकणार आहे. याचा वापर करून ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे तसेच दुसर्या युजरला पैसे देऊ शकतो. अॅप च्या UPI International feature चा वापर करून cross-border payments देखील करता येऊ शकतं. या अॅप द्वारा UPI IDs काढणं, बॅंक अकाऊंट्स बदलल्णं आणि setting mandates चा देखील पर्याय देता येणार आहे. प्रत्येक UPI transaction सोबत रिवॉर्ड्स देखील दिले जाणार आहेत.
अॅपचा वापर केल्याने बॅंकिंगचा अनुभव देखील सुकर होणार आहे. यामध्ये झिरो बॅलंस सेव्हिंग अकाऊंट उघडता येणार आहे. या अकाऊंटचा वापर करून कस्टमर्सना फंड्स पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. JioFinance चा वापर करून देखील अन्य सेवा ज्यामध्ये बिल भरणं, मोबाईल, फास्टटॅग रिचार्ज, DTH recharge करता येणार आहे. क्रेडिट कार्डचं पेमेंट करता येणार आहे. 'लोन ऑन चॅट' देखील मिळणार आहे. JioFinance ॲपद्वारे दिलेली कर्ज सुविधा सर्व पगारदार आणि MSME ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
ॲप विमा सुविधा देखील देणार आहे या द्वारा JioFinance मध्ये जीवन, आरोग्य, दुचाकी आणि मोटर विमा योजना तपासू शकतात आणि मिळवू शकतात.
जाहिरात
जाहिरात