Photo Credit: MSI
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये तुम्हांला तुमच्याकडील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्तामध्ये अपग्रेड करण्याची संधी आहे. या सेल मध्ये आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर दमदार डिस्काऊंट्स आणि डिल्स मिळणार आहेत. ग्राहकांना या सेल मध्ये टॅबलेट्स, लॅपटॉप्स सह घरातील अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू भरघोस सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असणार आहेत. ग्राहकांना या सेल मध्ये 50,000 पेक्षा कमी दरामध्येही अनेक चांगले लॅपटॉप्स मिळणार आहेत. यामध्ये Acer, Asus, Dell, आणि HP चे लॅपटॉप्स मिळणार आहेत. जर तुम्ही गेमर असाल आणि तुम्ही पीसी वर फार पैसे उधळू इच्छित नसाल तर अनेक चांगले लॅपटॉप्स मिळणार आहेत. यामध्ये 1 लाख पेक्षा कमी किंमतीचे लॅपटॉप मिळणार आहेत.
MSI Katana A17 Gaming laptop वर देखील अमेझॉन च्या सेल मध्ये चांगली सूट मिळणार आहे. 1,29,990 रूपयांचा हा लॅपटॉप आता सेल मध्ये 86,490 रूपयात अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये मिळणार आहे.
किंमतीमध्ये कपातीसोबतच ग्राहकांना 10 हजार पर्यंतची काही बॅंक डिस्काउंट मिळणार आहेत. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वर 5000 रूपयांपर्यंतची कूपन डिस्काऊंट देखील मिळणार आहे. जुना लॅपटॉप देऊन नवा विकत घेणार्यांनाही 20 हजारापर्यंत डिस्काऊंट मिळू शकते. सोबतच ज्यांना पूर्ण रक्कम देऊन लॅपटॉप घेणं शक्य नाही अशांना या अमेझॉनच्या सेल मध्ये नो कॉस्ट इएमआय चा देखील पर्याय आहे.
पहा 1 लाखापेक्षा कमी रूपयात कोणते लॅपटॉप्स अमेझॉन सेल मध्ये मिळू शकतात?
Acer ALG Gaming Rs. 47,990
Asus TUF A15 Gaming Rs. 84,490
Asus TUF A15 Gaming Rs. 57,490
Dell G15 Gaming Rs. 66,490
HP Omen 16 Gaming Rs. 92,990
HP Victus Gaming Rs. 72,990
Lenovo LOQ Gaming Rs. 91,490
Lenovo LOQ Gaming Rs. 71,490
MSI Katana A17 Gaming Rs. 86,490
MSI Thin 15 Gaming Rs. 46,990
HP Victus Gaming लॅपटॉप वर 16% सूट आहे तर Asus TUF A15 Gaming लॅपटॉप वर तब्बल 67% सूट मिळणार आहे. Rs 39,990 पासून या सेल मध्ये लॅपटॉप्सची रेंज सुरू होत आहे.
जाहिरात
जाहिरात