जुना स्मार्टफोन घरात सुरक्षा कॅमेरा म्हणून काम करू शकतो.
Photo Credit: Pexels/Adam Wilson
जुना स्मार्टफोन सुरक्षा कॅमेरा बनू शकतो.
स्मार्टफोन निर्माता कंपन्या सतत आपल्या डिव्हाइसेसमध्ये नवीन फीचर्स देत असतात. त्यामुळे ग्राहकही नवीन फोन खरेदी करतात आणि वापरू लागतात. मात्र, अशावेळी प्रश्न पडतो की जुने पण व्यवस्थित चालणारे स्मार्टफोन काय करायचे? अनेक जण ते विकून टाकतात, तर काही जण ते घरीच पडून ठेवतात. पण हे जुने स्मार्टफोन निष्क्रिय पडून राहण्याऐवजी तुम्ही त्यांचा वापर सिक्युरिटी कॅमेऱ्यासारखाही करू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जुना फोन, स्थिर इंटरनेट कनेक्शन आणि सिक्युरिटी कॅमेरा अॅपच्या मदतीने तुम्ही एक सोपी मॉनिटरिंग सिस्टीम तयार करू शकता. या सेटअपमुळे कोणतेही महागडे सिक्युरिटी हार्डवेअर न खरेदी करता घराचा प्रवेशद्वार, हॉल, पाळीव प्राणी किंवा मुलांवर लक्ष ठेवणे शक्य होते.
सर्वप्रथम तुम्हाला दोन स्मार्टफोन लागतील. त्यापैकी जुना फोन कॅमेऱ्याचे काम करेल, तर दुसरा फोन एका ठिकाणी ठेवला जाईल. तुमचा सध्याचा स्मार्टफोन व्ह्यूअर डिव्हाइस म्हणून काम करेल, ज्याद्वारे तुम्ही दूरूनही कॅमेऱ्याची लाईव्ह फीड पाहू शकता. सेटअपसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन आणि चांगली बॅटरी असणे आवश्यक आहे.
आता दोन्ही फोनमध्ये सिक्युरिटी कॅमेरा अॅप इन्स्टॉल करा. असे अॅप निवडा ज्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग, मोशन डिटेक्शन, रिमोट व्ह्यूइंग, लोकल रेकॉर्डिंग आणि टू-वे ऑडिओ यांसारखी फीचर्स असतील.
अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ते दोन्ही फोनमध्ये उघडा आणि एकाच अकाउंटच्या क्रेडेन्शियल्सचा वापर करून साइन-इन करा.
सेटअपदरम्यान जुन्या स्मार्टफोनला कॅमेरा डिव्हाइस आणि सध्याच्या स्मार्टफोनला व्ह्यूअर डिव्हाइस म्हणून सेट करा. यासाठी QR कोड, अकाउंट सिंकिंग किंवा मॅन्युअल पेअरिंग यांसारख्या पद्धती वापरता येतात.
जुना स्मार्टफोन त्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला नजर ठेवायची आहे. फोन थोडा उंच ठेवल्यास अधिक क्षेत्र कॅमेऱ्यात दिसेल आणि कॅमेऱ्याचा लेन्स संबंधित भाग स्पष्टपणे कव्हर करू शकेल.
सिक्युरिटी कॅमेरा दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी फोनची बॅटरी संपल्यास तो चार्जरला जोडून ठेवा. जवळ वॉल आउटलेट नसेल तर पॉवर बँकचाही वापर करू शकता. त्यामुळे बॅटरी संपण्याची चिंता राहणार नाही.
लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी फोन नेहमी इंटरनेटशी कनेक्ट असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थिर Wi-Fi सिग्नल उपलब्ध असल्याची खात्री करा. इंटरनेटचा वेग कमी असल्यास फीडमध्ये उशीर होणे किंवा बफरिंगसारख्या समस्या येऊ शकतात.
सर्व कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर व्ह्यूअर डिव्हाइसवरून लाईव्ह फीड पाहा. संबंधित जागेचा व्हिडिओ योग्य प्रकारे कॅप्चर होत आहे की नाही, हे तपासा.
तुमच्या गरजेनुसार मोशन डिटेक्शनची संवेदनशीलता, रेकॉर्डिंग आणि नोटिफिकेशन सेटिंग्जमध्ये बदल करू शकता.
तुमच्याकडे वापरात नसलेले अनेक स्मार्टफोन असतील तर त्यांनाही स्वतंत्र कॅमेऱ्यांमध्ये रूपांतरित करून तुमचा सेटअप आणखी मोठा करू शकता. सर्व डिव्हाइसेस एकाच अकाउंट आणि Wi-Fi नेटवर्कशी कनेक्ट असणे आवश्यक आहे.
जाहिरात
जाहिरात
Milagrow iMap G5 Eco Robotic Vacuum Cleaner Launched in India With Up to 14,000Pa Suction: Price, Features
Samsung Unveils AI-Powered Pet Health Monitoring Tool for Galaxy Smartphones at VivaTech 2026