विकसनशील देशांमध्ये AI मुळे ४.५ टक्के नोकऱ्या जाण्याचा धोका आहे, जो विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे म्हटले जाते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. AI मुळे भविष्यात नोकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो आणि लाखो लोकांना रोजगार गमवावा लागू शकतो अशी चर्चा वारंवार होत असते. मात्र, वर्ल्ड बँकच्या अहवालात भारतासारख्या देशांमध्ये AI चा परिणाम आतापर्यंत सांगितला जात होता तितका गंभीर होणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. या नव्या अहवालामुळे AI बाबत भविष्यासाठी नवी आशा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
नोकऱ्यांवर AI चा परिणाम आणि मार्केटमध्ये तणाव दिसून येत होता. लोकांच्या मनातील वाढता तणाव दूर करण्यासाठी वर्ल्ड बँकने म्हटले आहे की विकसित देशांच्या तुलनेत उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये रोजगारासाठी AI कमी धोका निर्माण करतो. अहवालात नमूद करण्यात आले आहे की विकसित देशांमध्ये AI मुळे 14.2 टक्के नोकऱ्यांवर धोका आहे. मात्र, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये केवळ 4.5 टक्के नोकऱ्यांवरच AI चा परिणाम होण्याची शक्यता आहे.
याचा थेट संबंध अशा अर्थव्यवस्थांशी आहे ज्या मोठ्या प्रमाणावर शेती आणि लघुउद्योगांवर अवलंबून आहेत. म्हणजेच ज्या देशांमध्ये लोक शेतीवर अवलंबून आहेत, तिथे AI चा परिणाम तुलनेने कमी असेल. उलट, ज्या देशांमध्ये आधीपासूनच अशा तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, ज्याची जागा AI सहज घेऊ शकतो, तिथे त्याचा परिणाम अधिक जाणवेल. दुसरीकडे, अहवालात असेही म्हटले आहे की AI मुळे लोकांचे रोजगार संपणार नाही, तर त्यांच्यासोबत काम करणारा एक उपयुक्त सहकारी ठरू शकतो.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे AI मुळे विकसित देशांना जितका फायदा होईल, तितकाच जवळपास फायदा विकसनशील देशांनाही होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार, विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये AI मुळे 16.2 टक्के नोकऱ्यांची उत्पादकता वाढू शकते, तर उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हा आकडा सुमारे 18.7 टक्के असू शकतो. वर्ल्ड बँकेने म्हटले आहे की AI आधीपासूनच लोक, उद्योग आणि सरकारांना समस्या सोडवणे, माहितीचे विश्लेषण करणे, अधिक अचूक अंदाज बांधणे आणि मोठ्या प्रमाणावर सेवा पुरवणे यामध्ये मदत करत आहे. विशेषतः विकसनशील देशांमध्ये AI साधने अधिक उपयुक्त ठरू शकतात.
जगातील अनेक भागांमध्ये AI डॉक्टरांना रुग्णांचे आजार ओळखण्यात, शेतकऱ्यांना पिकांबाबत योग्य निर्णय घेण्यात, उद्योगांना उत्पादकता वाढवण्यात आणि सरकारांना कर संकलन तसेच आपत्तीच्या काळात मदत करण्यात सहाय्य करत आहे. अहवालात भारतातील सर्वम AI मॉडेलचाही उल्लेख करण्यात आला आहे. देशात AI चा वापर हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी केला जात असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. वर्ल्ड बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंदरमीत गिल यांच्या मते, विकसनशील देशांना मोठे डेटा सेंटर किंवा महागडी AI मॉडेल्स उभारण्याची गरज नाही. भारतासारखे देश आपल्या स्थानिक गरजांनुसार छोटे आणि किफायतशीर AI टूल्स विकसित करून त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे शेती, शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणता येऊ शकते.
जाहिरात
जाहिरात
Huawei MatePad SE 11, MatePad 11.5 PaperMatte Edition Launched in India: Price, Specifications
Redmi K200 Series Could Replace K110, Executive Hints Ahead of K100 Series Launch