Photo Credit: HMD
भारतामध्ये सोमवार 16 सप्टेंबर दिवशी HMD Skyline 2 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर लॉन्च करण्यात आला आहे. भारतात लॉन्च करण्यापूर्वी या स्मार्टफोनची युरोपामध्ये पहिली झलक दाखवण्यात आली होती. हा हॅन्डसेट Snapdragon 7s Gen 2 chipset वर चालणार आहे तर त्याचा रॅम 12 जीबी आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,600mAh ची बॅटरी आहे. सेल्फ रिपेर किट सोबत तो पाठवला जातो. या फोनमध्ये काही भाग हे बदलता येऊ शकतात. डिस्प्ले आणि बॅटरी बदलता येऊ शकतात. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 14 वर चालतो तर 108 मेगा पिक्सेलचा यामध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट आहे. 50 मेगा पिक्सेलचा सेल्फी शूटर आहे.
भारतामध्ये HMD Skyline ची किंमत 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या पर्यायासाठी 35,999 मोजावे लागणार आहेत. तर फोन निऑन पिंक आइ ट्विस्टेड ब्लॅक कलरवे मध्ये उपलब्ध आहे. हा फोन भारतामध्ये अमेझॉन आणि एचएमडी इंडिया च्या वेबसाईट वर तसेच ऑफलाईन रिटेल स्टोअर मधून विकत घेतला जाऊ शकतो. लॉन्च ऑफर मध्ये 33 W टाइप सी फास्ट चार्जर मोफत दिला जाणार आहे. हा फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे.
HMD Skyline हा 6.55 इंच पूर्ण एचडी स्क्रीनचा फोन आहे. ही स्क्रीन 1,800 x 2,400 pixels ची आहे. pOLED screen ही 144Hz च्या रिफ्रेश रेटची आहे. सर्वाधिक ब्राईटनेस लेव्हल ही 1,000 nits आहे. स्क्रीनला Gorilla Glass 3 प्रोटेक्शन आहे. या फोनला Snapdragon 7s Gen 2 चा सपोर्ट आहे. Android 14 वर फोन चालणार आहे.
HMD Skyline ला 108 मेगा पिक्सेलचा OIS प्रायमरी कॅमेरा आहे. 50MP टेलिफोटो लेन्स आणि 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. फोनच्या समोर 50MP ऑटोफोकस सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन "कॅप्चर फ्यूजन", 4x ऑप्टिकल झूम आणि पोर्ट्रेट मोडसह आहे. सेल्फी घेण्यासाठी एक बिल्ट-इन सेल्फी जेस्चर फीचर देखील देण्यात आले आहे.
HMD Skyline ला 33W वायर्ड फास्ट चार्जिंग आहे. तर 4,600mAh बदलू शकेल अशी बॅटरी आहे. हे 15W मॅगनेटिक वायरलेस आणि 5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग करता येणार आहे. फोन बॉक्समध्ये चार्जर नसेल. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GPS, NFC, OTG आणि USB Type-C यांचा समावेश आहे.
HMD Skyline ला डाव्या बाजूला एक कस्टम बटण आहे. याचा वापर करून विविध कामं पसर्नलाईज्ड केली जातात. फोनच्या बॅक पॅनलला स्क्रू काढून डिस्प्ले जर बिघडला तर बदलता येऊ शकतो. स्मार्टफोनला Qualcomm aptX Adaptive audio सपोर्ट असलेले ड्युअल स्पीकर आहे.
प्रोसेसर सपोर्ट म्हणून फोनमध्ये Snapdragon 7 Gen 2 चिपसेट दिला आहे. हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो आणि फोनमध्ये दोन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट दिले जातील. फोनमध्ये गुगल ड्राइव्ह क्लाउड स्टोरेज सपोर्ट दिला जात आहे.
भारतामध्ये लॉन्च झालेला हा HMD Skyline फोन मिड रेंज सेगमेंट मध्ये आहे. हा फोन पाहिला की अनेकांना नोकिया लुमियाची आठवण येईल.
जाहिरात
जाहिरात