10 हजरापेक्षा कमी किंमतीमध्ये Lava चा दमदार नवा स्मार्टफोन; पहा काय आहेत स्पेसिफिकेशन्स

10 हजरापेक्षा कमी किंमतीमध्ये  Lava चा  दमदार नवा स्मार्टफोन; पहा काय आहेत स्पेसिफिकेशन्स

Photo Credit: Lava

Lava Blaze 3 5G is claimed to be equipped with a segment-first VIBE light

महत्वाचे मुद्दे
  • ग्लास ब्लू आणि ग्लास गोल्ड रंगांमध्ये नवा स्मार्टफोन उपलब्ध
  • Vibe Light फीजरमुळे फोटो काढताना लाईटिंग देखील उत्तम दर्जाचे
  • दोन तासात होणार पूर्ण चार्ज
जाहिरात

Lava Blaze 3 5G भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Lava Blaze 2 5G नंतर हा फोन आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात हा फोन आला होता. या फोन मध्ये 90Hz चा डिस्प्ले आहे. तर MediaTek Dimensity 6300 chipset आहे सोबतच artificial intelligence चं देखील फीचर या फोनमध्ये देण्यात आलं आहे. या फोन मध्ये वाइब लाइट फीचर आहे त्यामुळे फोटो काढताना चांगलं लाईटिंग राहणार आहे.

Lava Blaze 3 5G ची भारतामधील किंमत काय?

भारतामध्ये Lava Blaze 3 5G या स्मार्टफोनची किंमात 11,499 पासून सुरू होते. कंपनीकडून सांगितल्याप्रमाणे ही स्पेशल लॉन्च किंमत आहे. काही बॅंक ऑफर्स युजर्सनी वापरल्या तर हा फोन 9999 पर्यंत मिळू शकतो. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या पर्यायासह उपलब्ध आहे. 18 सप्टेंबर पासून अमेझॉन वर या फोनची विक्री ठीक रात्री 12 वाजल्यापासून सुरू झाली आहे. फोन सोबत एका वर्षांची गॅरंटी देखील मिळणार आहे.

कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध आहे Lava Blaze 3 5G?

Lava Blaze 3 5G हा स्मार्टफोन 2 रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्लास ब्लू (Glass Blue) आणि ग्लास गोल्ड (Glass Gold)या रंगामध्ये उपलब्ध आहे.

Lava Blaze 3 5G ची स्पेसिफिकेशन काय आहेत?

Lava Blaze 3 5G या फोनचा डिस्प्ले 6.56-इंच HD+ hole-punch सह उपलब्ध आहे. याचं रेझ्युलेशन 720x1,600 pixels आहे. तर रिफ्रेश रेट 90Hz आहे. पिक्सेल डेंसिटी ही 269 ppi आहे. फोन हा 164.3×76.24×8.6mm आकारामध्ये आहे. तर फोनंचं वजन 201 ग्रॅम आहे. या फोनचा प्रोसेसर MediaTek Dimensity 6300 आहे. या फोनचं स्टोरेज 1 टीबी पर्यंत microSD card च्या मदतीने वाढवता येऊ शकते. रॅम देखील व्हर्च्युअली 6 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन अ‍ॅन्ड्रॉईड 14 वर चालणार आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 18W फास्टस्टिंग सुविधा आहे. त्यामुळे एकदा चार्जिंग केल्यानंतर दिवसभर ते पुरणार आहे. दरम्यान या स्मार्टफोन मध्ये क्लीन आणि एड-फ्री अ‍ॅड्रॉइड ओएस आहे.

Lava Blaze 3 5G या फोन मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा आहे. त्यामध्ये 50 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आहे. त्याचं aperture f/1.8 आहे. तर 2 मेगा पिक्सेलचा सेकेंडरी AI camera आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेल्फी साठी आहे. या स्मार्टफोनमध्ये 2K resolution पर्यंत रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. प्रति सेकंद 30 फ्रेम्स पर्यंत रेकॉर्डिंग होईल.त्यामुळे आता या फोनवर आता 1440p@30fps आणि 1080p@30fps मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे. AI Emoji Mode, Portrait Mode, Pro Video Mode, Dual View Video, आणि AI Mode यामध्ये मिळणार आहेत.

फोनमध्ये कनेक्टीव्हिटीचा विचार करता या हॅन्डसेटला यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. 3.5 एमएम चा हेडफोन जॅक आहे. हा फोन 5 जीला सपोर्ट करणारा आहे. ड्युअल 4G VoLTE, ड्युअल-बँड वाय-फाय 5 आणि ब्लूटूथ 5.2. हे GLONASS आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी यात साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील मिळणार आहे.

लावा या भारतीय मल्टिनॅशनल कंपनीने भारतीय बाजारपेठेत आणलेला हा स्मार्टफोन आता बजेट मध्ये नवा फोन विकत घेणार्‍यांसाठी एक चांगला पर्याय आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. YouTube Premium services चा मोफत अ‍ॅक्सेस पहा कोणत्या जिओ युजर्सना मिळणार
  2. Galaxy S25 series 22 जानेवारीला होणार लॉन्च; इथे पहा त्याचं डिझाईन, स्पेसिफिकेशन कसं असेल
  3. Oppo Reno 13 5G, Reno 13 Pro 5G पहा कुठे, कधी विकत घेता येणार
  4. Poco X7 5G, Poco X7 Pro 5G भारतात कुठे, कधी खरेदी करता येणार
  5. Amazon Great Republic Day sale 2025 मध्ये एसबीआय ग्राहकांसाठी खास ऑफर्स; पहा काय खास
  6. नर कोळी वास कसा घेतात? पहा अहवाल काय सांगतो
  7. Samsung Galaxy Unpacked 2025 मध्ये Galaxy Ring 2 ते Galaxy S series काय काय पाहता येणार
  8. Oppo Reno 13F 5G, Reno 13F 4G लवकरच येणार बाजारात सोबत Oppo Reno 13 5G, Reno 13 Pro 5G ची देखील भेट
  9. Tecno Pop 9 5G भारतात 8 जानेवारीपासून विक्रीसाठी खुला; पहा किंमत, फीचर्स
  10. OnePlus 13, OnePlus 13R झाला लॉन्च पहा या स्मार्टफोन्सची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स सह किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »