जाणून घ्या शास्त्रज्ञांनी का नोंद करून ठेवण्यास सांगितली आहे 22 सप्टेंबर ही तारीख

जाणून घ्या शास्त्रज्ञांनी का नोंद करून ठेवण्यास सांगितली आहे 22 सप्टेंबर ही तारीख

eptember's equinox can mean stronger, more intense Northern Lights

महत्वाचे मुद्दे
  • सप्टेंबरच्या विषुववृत्ती दरम्यान Northen Lights तीव्र असण्याची शक्यता आ
  • Russell McPherron Effect मुळे सप्टेंबरमध्ये ऑरोरा अधिक मजबूत होतो
  • सप्टेंबर महिना विषुववृत्त उत्तर गोलार्धात Hemisphere Aurora आणू शकते
जाहिरात

शास्त्रज्ञांच्या मते, 2024 वर्षातील सप्टेंबर महिना फारच विशेष असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्याची 22 तारीख. कारण 22 सप्टेंबर 2024 रोजी फॉल इक्वीनॉक्सच्या आसपास अविस्मरणीय अशा Northen Lights चे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते या कालावधीत नेहमीपेक्षा जास्त भूचुंबकिय वादळे होण्याचा अंदाज आहे, ज्याचे मुख्य कारण रसेल मॅकफेरॉन इफेक्ट असू शकते. 1973 मध्ये सुध्दा अशीच एक घटना घडली होती, जेव्हा पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र विषुववृत्तादरम्यान सौर वाऱ्याशी अधिक जवळून संरेखित होत होते, तेव्हा चार्ज केलेले कण आपल्या वातावरणात अधिक सहजपणे प्रवेश करू शकतात. या संरेखनामुळे अनेकदा Auroral क्रियाकलाप वाढतो, जो रात्रीच्या आकाशात आपल्यासाठी नेत्रदीपक प्रकाश शोसाठी जसे काही एक स्टेज सेट करतो.

रसेल-मॅकफेरॉन इफेक्ट हे मार्च आणि सप्टेंबरच्या महिन्यात विषुववृत्ताच्या आसपास Aurora अधिक का आढळतात हे स्पष्ट करण्यात मदत करते. त्याचे काय होते तर या काळात, पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांचे झुकणे सौर वाऱ्याशी संरेखित होते आणि चार्ज केलेले कण आणि आपले पृथ्वीवरील वातावरण यांच्यातील परस्परसंवाद सुलभ होतो. ज्यामुळे हे कण ऑक्सिजन आणि नायट्रोजनच्या रेणूंशी टक्कर देतात, आणि आपल्याला Aurora मध्ये दिसणारे आकर्षक रंग बाहेर पडतात. आणि या रंगां मुळेच Aurora तयार होतो. विषुववृत्त दरम्यान हे संरेखन Northen Lights, विशेषतः उत्तर गोलार्धात पाहण्यासाठी एक आदर्श वेळ बनवत असते.

11 वर्षांच्या सौरचक्रात सूर्याची चुंबकीय क्रिया शिगेला पोहोचल्याने भूचुंबकीय वादळे होण्याची शक्यता वाढते. या वर्षाच्या मे महिन्यात, दोन दशकांहून अधिक काळातील सर्वात मजबूत भूचुंबकीय वादळाने दक्षिणेकडे फ्लोरिडा आणि मेक्सिकोपर्यंत Aurora निर्माण केल्याचे निदर्शनास आले आहे. सौर क्रियाकलाप सतत वाढत असल्याने, सप्टेंबर महिना या विस्मयकारक नैसर्गिक प्रदर्शनांचे साक्षीदार होण्याची आणखी चांगली संधी आपल्यासाठी घेऊन येत आहे, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये शरद ऋतूतील विषुव दिवसाचा प्रकाश आणि अंधाराचा समतोल साधतो, उत्तर गोलार्धात या गोष्टीचा प्रत्येकी १२ तासांचा अनुभव येतो. ज्यामुळे हे Northen Lights पाहण्यासाठी एक आदर्श आणि आकर्षक असे दृश्य देते. तुलनेने उन्हाळ्यापेक्षा शरद ऋतूमध्ये रात्री Aurora त्यांच्या सर्व वैभवात पाहण्याची शक्यता लक्षणीयरीत्या जास्त आहे.

Comments
पुढील वाचा: Aurora, Northern Lights, September Equinox
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. YouTube Premium services चा मोफत अ‍ॅक्सेस पहा कोणत्या जिओ युजर्सना मिळणार
  2. Galaxy S25 series 22 जानेवारीला होणार लॉन्च; इथे पहा त्याचं डिझाईन, स्पेसिफिकेशन कसं असेल
  3. Oppo Reno 13 5G, Reno 13 Pro 5G पहा कुठे, कधी विकत घेता येणार
  4. Poco X7 5G, Poco X7 Pro 5G भारतात कुठे, कधी खरेदी करता येणार
  5. Amazon Great Republic Day sale 2025 मध्ये एसबीआय ग्राहकांसाठी खास ऑफर्स; पहा काय खास
  6. नर कोळी वास कसा घेतात? पहा अहवाल काय सांगतो
  7. Samsung Galaxy Unpacked 2025 मध्ये Galaxy Ring 2 ते Galaxy S series काय काय पाहता येणार
  8. Oppo Reno 13F 5G, Reno 13F 4G लवकरच येणार बाजारात सोबत Oppo Reno 13 5G, Reno 13 Pro 5G ची देखील भेट
  9. Tecno Pop 9 5G भारतात 8 जानेवारीपासून विक्रीसाठी खुला; पहा किंमत, फीचर्स
  10. OnePlus 13, OnePlus 13R झाला लॉन्च पहा या स्मार्टफोन्सची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स सह किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »