Reliance Jio ने अलीकडच्या काळात एक नवीन ॲप लॉन्च केले आहे, ज्याचे नाव आहे JioTV Plus. हे ॲप Amazon Fire OS द्वारे समर्थित असून अँड्रॉइड, ॲपल आणि अन्य प्रकारच्या टीव्ही सोबत सुसंगत असणार आहे. Jio Fiber आणि Jio Air Fiber कनेक्शन सोबत येणाऱ्या Jio Set Top Box साठी हे ॲप प्रवेशयोग्य असेल. JioTV Plus या ॲपचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय म्हणजे सर्वसामान्यपणे मनोरंजन, क्रीडा, संगीत, लहान मुले, व्यवसाय आणि भक्ती अशा विविध प्रकारच्या मनोरंजना सोबतच विविध शैली आणि भाषांमध्ये 800 हून अधिक डिजिटल चॅनलच्या संचयामध्ये उपलब्ध आहे. चला तर मग बघुयात काय आहेत या JioTV Plus ची वैशिष्ट्ये आणि पात्रता.
JioTV Plus ची वैशिष्ट्ये.
Reliance Jio च्या मते, JioTV Plus ॲपला सर्व ॲप्स साठी एकदा लॉग इन करणे आवश्यक असेल. हे ॲप आधुनिक मार्गदर्शकते सोबतच रिमोटची सुसंगता, प्लेबॅक गती नियंत्रण, कॅच अप टीव्ही आणि वैयक्तिक शिफारसी देण्यास समर्थ आहे. त्याशिवाय वापरकर्त्यांना त्यांचा शोध अनुभव सोपा बनविण्यासाठी श्रेणी आणि भाषा विविध प्रकारचे फिल्टर वापरून शोधू शकतात.
JioTV Plus या ॲप मध्ये OTT प्लॅटफॉर्म वर प्रवेश करण्यासाठी, वापरकर्त्यांना JioCinema Premium, Disney+ Hotstar, Sony Liv, Zee5 आणि FanCode मध्ये देखील प्रवेश मिळू शकतो. वापरकर्त्यांना मुलांचा विभाग देखील दिसेल ज्यामध्ये मुलांसाठी निवडलेले कार्यक्रम समाविष्ट केलेले असतील. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सोबतच हे ॲप Android TV, Apple TV आणि Amazon Firestick TV वर डाउनलोड करण्यासाठी देखील उपलब्ध आहे. Reliance Jio ने असेही जाहीर केले आहे की, LG OS चालित टीव्हीसाठी समर्थन करणारे या ॲपचे व्हर्जन लवकरच बाजारात आणले जाईल.JioTV Plus ॲपची पात्रता काय आहे?
JioTV Plus हे ॲप सर्वांनाच वापरता येणे शक्य नाही आहे. त्यामुळे JioTV Plus या ॲपची पात्रता जाणून घ्या. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व Jio Air Fiber आणि Jio Fiber वापरकर्त्यांना Jio TV Plus हे ॲप वापरता येणार नाही आहे. या ॲप मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किंवा हे ॲप वापरण्याकरिता पात्र ठरण्यासाठी तुम्हाला Jio Air Fiber च्या सर्व प्लॅन्सची, JioFiber Postpaid च्या 599 रूपये, 899 रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या प्लॅन्सची आणि Jio Fiber prepaid च्या 999 रुपये आणि त्यावरील रुपयांच्या प्लॅन्सची सदस्यता घेणे आवश्यक आहे.
जे वापरकर्ते पात्र आहेत, त्यांनी नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरून JioFiber आणि Jio Air Fiber सोबत JioTV Plus ॲपमध्ये लॉग इन करणे आवश्यक आहे. एकदा, तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रमाणीकरणासाठी एक OTP देण्यात येईल आणि जो सादर केल्यानंतर तुम्हाला ॲप मध्ये प्रवेश दिला जाईल.