Agent सिनेमा अखेर आला ओटीटी वर; कधी, कुठे पहाल? घ्या जाणून

Agent सिनेमामध्ये Mammootty, Sakshi Vaidya, आणि Dino Morea महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Agent सिनेमा अखेर आला ओटीटी वर; कधी, कुठे पहाल? घ्या जाणून

Photo Credit: YouTube/OTT Telugu Flash

बराच विलंब झाल्यानंतर, एजंट १४ मार्च २०२५ पासून सोनी LIV वर स्ट्रीम होईल

महत्वाचे मुद्दे
  • Agent मध्ये Akhil Akkineni रॉ एजंटच्या मुख्य भूमिकेत
  • Akhil Akkineni चा Agent Sony LIV वर पाहता येणार
  • हा सिनेमा तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत पाहता येणार
जाहिरात

Akhil Akkineni च्या अ‍ॅक्शन पॅक्ड स्पाय थ्रिलर Agent सिनेमाची ओटीटी वर प्रतिक्षा होती. अखेर या सिनेमाची ओटीटी वरील रीलीज डेट समोर आली आहे. Agent सिनेमा टॉलिवूड प्रेमींना 14 मार्चपासून Sony LIV वर पाहता येणार आहे. हा सिनेमा तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत पाहता येणार आहे. हा सिनेमा Surender Reddy यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमामध्ये Mammootty, Sakshi Vaidya, आणि Dino Morea महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Agent कधी, कुठे पहाल?

Agent हा सिनेमा 14 मार्चपासून एक्सक्लुझिव्हली Sony LIV वर पाहता येणार आहे. हा सिनेमा 28 एप्रिल 2023 ला सिनेमागृहामध्ये रीलीज करण्यात आला आहे. सिनेमागृहात हा फारसा कामगिरी करू न शकल्याने त्याच्या ओटीटी रीलीजलाही बराच वेळ लागला. सिनेमाचा कंटेंट, लॉजिस्टिक आणि स्ट्रॅटेजिक डिसिजन यांच्यामध्ये बराच वेळ गेला. आता स्ट्रिमिंग ची तारीख ठरल्यानंतर Akhil Akkineni च्या फॅन्सला तो घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.

Agent चा ट्रेलर आणि प्लॉट काय?

Agent च्या ट्रेलर मध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन्स पहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी स्टोरी लाईन आहे तर कलाकारांचे दमदार परफॉर्मन्सेस आहेत. सिनेमा मध्ये अभिनेता Akhil Akkineni हा RAW agent Ricky ची भूमिका साकारत आहे. त्याला Dharma साकारणार्‍या Dino Morea या माजी एजंटला पकडण्याची जबाबदारी असते. रिकी स्वतःला अशा एका मोहिमेत अडकलेला आढळतो जो देशाचे भवितव्य ठरवू शकतो. स्टायलिश दृश्ये, अ‍ॅड्रेनालाईन-पंपिंग सीक्वेन्स आणि एक तीव्र कथन यासह, चित्रपटाचा उद्देश एक रोमांचक सिनेमॅटिक अनुभव देणे आहे.

सिनेमामध्ये कलाकार कोण?

Agent मध्ये उत्तम आणि अनुभवी कलाकारांचा समावेश आहे. Akhil Akkineni रॉ एजंट रिकीची मुख्य भूमिका साकारत आहे, तर मामूटी रॉ प्रमुख कर्नल महादेवची भूमिका साकारत आहे. दिनो मोरिया खलनायक आहे, तर साक्षी वैद्य ही फीमेल लीड आहे. सुरेंदर रेड्डी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Agent ला प्रतिसाद कसा?

Agent हाअ सिनेमा बॉक्सऑफीस वर फार चांगली कामगिरी करू शकलेला नाही. सिनेमाला संमिश्र किंवा नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. Akhil Akkineni, Surender Reddy यांना या प्रोजेक्टमध्ये काम केल्यावरून टीकेलाही सामोरे जावं लागलं. मात्र अशा परिस्थितीमध्येही सिनेमा ओटीटी वर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple iPhone 17 Air च्या लॉन्चपूर्वी समोर आले अपडेट्स
  2. Apple iPhone 17 ‘Awe Dropping’ कार्यक्रम आज; महत्त्वाच्या घोषणांबाबत वाढली उत्सुकता
  3. iPhone 17 Pro मध्ये 8X झूम, प्रगत कूलिंग टेक्नॉलॉजी असणार? पहा अपडेट्स
  4. Apple Watch Series 11 आणि Ultra 3 मध्ये काय आहे खास? घ्या जाणून अपडेट्स
  5. Motorola Edge 60 Neo सोबत पॉवरफुल Moto G06 आणि G06 Power देखील आले बाजारात
  6. अवघ्या 5.9mm जाडीचा Nubia Air, 5000mAh बॅटरीसह ग्लोबल मार्केट मध्ये दाखल; पहा किंमत, डिझाईन कसे?
  7. iPhone 17 Pro च्या कूलिंग टेक्नोलॉजीमध्ये मिळणार मोठे अपडेट्स
  8. 15 सप्टेंबरला भारतात येणार Oppo F31 Series; डिझाईन, फीचर्स लीक
  9. आयफोन 17 सिरीज 9 सप्टेंबरला होणार लाँच; आयफोन 17 एअर ठरणार लक्ष्यवेधी, पहा अपडेट्स
  10. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »