Samsung Galaxy S24 झाला आहे स्वस्त फक्त 15 ऑगस्ट पर्यंत

Samsung Galaxy S24 च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या प्रकाराची किंमत 79,999 रुपये इतकी असून 15 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असलेल्या सवलतीमुळे ती 67,999 रुपये इतकी कमी करण्यात आली आहे.

Samsung Galaxy S24 झाला आहे स्वस्त फक्त 15 ऑगस्ट पर्यंत
महत्वाचे मुद्दे
  • Samsung देत आहे Samsung Galaxy S24 च्या किंमतीवर सूट.
  • आता 256GB स्टोरेज ह्या आवृत्तीची किंमत आहे फक्त 67,999 रुपये.
  • Samsung Galaxy S24 मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
जाहिरात
Samsung या स्मार्टफोन कंपनीने भारतात जानेवारी 2024 मध्ये Samsung Galaxy S24 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. लॉन्च झाल्यानंतर या स्मार्टफोनची किंमत भारतात 79,999 रुपये इतकी ठेवण्यात आली होती. पण स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या स्मार्टफोनवर मर्यादित काळासाठी सवलत देण्याचे Samsung ने ठरवले आहे. या सवलतीमुळे तुम्हाला जवळजवळ 12,000 रुपयांची बचत करता येणार आहे. त्यासोबतच EMI वर सुध्दा बऱ्याचशा सवलती मिळणार आहेत. चला तर मग आपण पाहुयात या सवलतीं बाबत सविस्तर माहिती आणि Samsung Galaxy S24 ची वैशिष्ट्ये. 

Samsung Galaxy S24 ची वैशिष्ट्ये


Samsung Galaxy S24 चा डिस्प्ले 6.2 इंचाचा असून 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबतच डायनॅमिक AMOLED डिस्प्ले यामध्ये देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Exynos 2400 SoC या प्रोसेसर द्वारे समर्थित असून Qualcomm Snapdragon 8 Gen 3 या चीपसेट चे देखील समर्थन करतो. स्मार्टफोनच्या मागील बाजूस आपल्याला तीन कॅमेऱ्यांचा सेटअप दिसतो ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी काढण्यासाठी Samsung Galaxy S24 मध्ये 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सुध्दा देण्यात आला आहे. 

यामध्ये धूळ आणि पाण्याचा प्रतिरोध करण्यासाठी IP68 रेटिंग देण्यात आले आहे. या स्मार्टफोनची बॅटरी ही 4000 mAh ची असून 25 वॅट च्या वायर आणि 45 वॅट च्या वायरलेस चार्जिंगचे समर्थन करते. या स्मार्टफोनची रॅम क्षमता 8GB ची असली तरीही या स्मार्टफोनचे 128GB, 256GB आणि 512GB या स्टोरेज क्षमटेसोबत विविध प्रकार उपलब्ध आहेत.

Samsung Galaxy S24 वरील उपलब्ध सवलती


Samsung Galaxy S24 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज ह्या प्रकारावर 12,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत ही 74,999 रुपये असून आता सवलतीमुळे ती 62,999 रुपये इतकी झाली आहे. EMI च्या सवलती बद्दल पाहायचे तर सर्वांत कमी म्हणजे 5,666 रुपयांपासून या स्मार्टफोनचे मासिक हफ्ते सुरू होत आहेत. Samsung च्या अधिकृत वेबसाईट वर सुध्दा ही सवलत 15 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. 

त्यासोबतच Samsung Galaxy S24 च्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या प्रकाराची किंमत 79,999 रुपये इतकी असून 15 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असलेल्या सवलतीमुळे ती 67,999 रुपये इतकी कमी करण्यात आली आहे. 8GB रॅम आणि 512GB स्टोरेज या प्रकाराची मूळ किंमत 89,999 रुपये इतकी असून सध्याच्या ऑफरमध्ये हा स्मार्टफोन 77,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Amazon आणि Flipcart वर सुध्दा ग्राहकांना ह्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे. ज्यामध्ये Samsung Galaxy S24 ची किंमत 56,000 रुपये आणि 62,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
 
Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »