Photo Credit: iQOO
Amazon Great Indian Festival 2024 मध्ये यंदा iQOO smartphones दमदार सवलतींमध्ये उपलब्ध होणार आहे. अमेझॉन वरील हा ग्रेट इंडियन फेस्टिवल 27 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. अमेझॉन प्राईम युजर्सना सेलच्या एक दिवस आधी म्हणजे 26 सप्टेंबर पासून सेल मध्ये खरेदी करता येणार आहे. iQOO हॅन्डसेट्स ज्यामध्ये iQOO Z9x 5G, Z9 Lite 5G, Z9s Pro 5G, Neo 9 Pro, आणि iQOO 12 5G,यासोबतच iQOO TWS 1e earbuds उपलब्ध होणार आहेत. हे सारे प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
स्वस्तामध्ये खरेदी करताना काही बॅंक ऑफर्सचा देखील फायदा घेता येणार आहे. SBI च्या क्रेडीट आणि डेबिट कार्ड युजर्सना तात्काळ 10% सूट मिळणार आहे. काही फोन तर एक्सचेंज करून घेतल्यास अजून थोडे स्वस्त दरात विकत घेता येतील. सध्या डील मध्ये iQOO Z9 Lite, iQOO Z9 5G,आणि iQOO Z7 Pro खरेदी करता येणार आहेत.
iQOO Z9 Lite जो 4GB + 128GB व्हेरिएंट्स साठी Rs. 10,499 लॉन्च झाला आहे.आता तो अमेझॉन ग्रेट इंडियन सेल मध्ये 9499 मध्ये विकत घेता येईल. तर iQOO Z9x आता सर्वात कमी दरात म्हणजे Rs. 10,749 मध्ये विकत घेता येणार आहे. हा लॉन्च झालेल्या वेळची किंमत 12,999 होती. हा 4GB + 128GB variant चा फोन आहे.
iQOO Z9s 5G आणि Z9s Pro 5G फोन या सेल मध्ये no-cost EMI मध्ये घेता येणार आहे. सहा महिन्यांपर्यंत हा फोन नो कॉस्ट ईएमआय मध्ये मिळेल. iQOO Z9s हा फोन 19,999 ऐवजी आता 17,499 मध्ये विकत घेता येणार आहे. हा फोन 8GB + 128GB च्या व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. iQOO Z9s Pro हा फोन 21,999 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. त्याचं व्हेरिएंट 8GB + 128GB आहे. हा फोन लॉन्च प्राईज पेक्षा 3000 रूपये स्वस्त दरात मिळेल. प्रो व्हेरिएंट मध्ये एक्सचेंज सोबत 1500 रूपये स्वस्त विकत घेता येणार आहे.
2024 Amazon Great Indian Festival sale मध्ये iQOO Neo 9 Pro देखील पुढील सहा महिन्यांसाठी no cost EMI सह विकत घेता येणार आहे. 8GB + 128GB version Rs. 35,999 मध्ये मिळतो तो या सेल मध्ये Rs. 31,999 मध्ये विकत घेता येणार आहे.
ग्राहकांना एक्सचेंज ऑफर मध्ये 2000 रूपयांची अधिक सूट मिळतील.
iQOO 12 5G भारतामध्ये डिसेंबर 2023 ला लॉन्च झाला होता. या Amazon sale मध्ये तो 12GB + 256GB व्हेरिएंटसाठी Rs. 47,999 मध्ये उपलब्ध होणार आहे. हा फोन Rs. 52,999 मध्ये लॉन्च झाला होता. दरम्यान युजर्स 9 महिन्यांसाठी no-cost EMI चा पर्याय आहे तर एक्सचेंज ऑफर्स मध्ये 2000 रूपयांची सूट मिळणार आहे.
iQOO TWS 1e earbuds जे भारतामध्ये ऑगस्ट महिन्यात Rs. 1,899 ला लॉन्च झाली होती.आता ते या 2024 Amazon Great Indian Festival मध्ये Rs. 1,599 मध्ये मिळणार आहे.
जाहिरात
जाहिरात