Photo Credit: Samsung
Samsung Galaxy S24 FE हा भारतामध्ये लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये Galaxy S23 FE लॉन्च झाला होता त्यानंतर आता त्याचा पुढील व्हेरिएंट आहे. या फोनचे डिझाईन्स आता ऑनलाईन वर लीक झाले आहेत. या स्मार्टफोन मधील फीचर्स सह चीपसेट आणि डिस्प्ले ची माहिती देखील लीक झाली आहे. दरम्यान या फोनची चर्चा सुरू असताना Galaxy S23 FE पेक्षा Samsung Galaxy S24 FE ची किंमत अधिक असणार असल्याची चर्चा आहे. युरोपियन मार्केट मध्ये हा फोन लॉन्च होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्स पाहता युरोपियन प्रमाणे अमेरिकन मार्केट मध्येही फोनची किंमत तशीच राहणार आहे.
Samsung Galaxy S24 FE ची अमेरिकेमधील किंमत त्याच्या मागील व्हेरिएंट च्या तुलनेत अधिक असण्याचा अंदाज Smartprix report मधून समोर आले आहेत. Steve H.McFly (@OnLeaks) च्या माहितीनुसार, Galaxy S24 FE ची किंमत अमेरिकेमध्ये $649 असण्याचा अंदाज आहे. भारतीय रूपयांमध्ये त्याची किंमत अंदाजे 54,200 रूपये असणार आहे. ही किंमत 128GB स्मार्टफोनची आहे. तर 256GB व्हेरिएंटची किंमत $709 आहे. ज्याची किंमत भारतीय रूपयामध्ये अंदाजे 59,200 आहे. त्यामुळे Galaxy S23 FE च्या लॉन्च किंमतीपेक्षा आता हा स्मार्टफोन 50 अमेरिकन डॉलर अधिक महाग असणार आहे. Galaxy S23 FE हा $599 ला लॉन्च झाला होता. ज्याची अंदाजे किंमत 50 हजार होती.
पूर्वीचे Galaxy S24 FE चे रिपोर्ट्स पाहता 8GB + 128GB च्या व्हेरिएंटची किंमत EUR 799 असू शकणार आहे. भारतीय रूपयांमध्ये ही किंमत अंदाजे 74100 रूप्पये आहे. युरोपियन देशामध्ये या फोन मध्ये मागील फोनच्या तुलनेत 100 EUR अधि मोजावे लागतील त्यामुळे 9200 अधिक महाग हा फोन असणार आहे.
Samsung Galaxy S24 FE मध्ये 6.7 इंच फूल एचडी आणि डिस्प्ले असणार आहे. तर 120Hz refresh rate असणार आहे. तर 1,900 nits पीक ब्राईटनेस लेव्हल आहे. या स्मार्टफोन मध्ये Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन आहे. या स्मार्टफोन मध्ये Exynos 2400e chipset असणार आहे तर बॅटरी 4,565mAh आहे. फोन सोबत 25W wired आणि 15W wireless चार्जिंग असणार आहे. फोनचा कॅमेरा पाहता 50 मेगापिक्सेल ट्रिपल रेअर कॅमेरा असणार आहे. तर सेल्फी शूटर 10 मेगापिक्सेल आहे. पूर्वीचे फोनचे लीक पाहता आता Samsung Galaxy S24 चं डिझाईन देखील पूर्वीच्या फोन प्रमाणे असणार आहे. या स्मार्ट फोन मध्ये अॅल्युमिनियम मिडल फ्रेम असणार आहे तर ग्लास रेअर पॅनल असणार आहे. हा फोन 5 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.
Samsung Galaxy S24 हा स्मार्टफोन निळा, हिरवा, ग्राफाईट, सिल्वर आणि पिवळा रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.
जाहिरात
जाहिरात