Photo Credit: NASA
सुनिता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर, अमेरिकेचे हे दोन्ही अंतराळवीर गेले बरेच दिवस International Space Station म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत. या अंतराळ स्थानकावर त्यांना पाठवण्याची मोहीम NASA या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेकडून पार पाडण्यात आली होती, पण या दोन्ही अंतराळवीरांच्या परतीची मोहीम पार पाडण्यात NASA अयशस्वी ठरले आहे. सुरुवातीच्या काळात या दोन्ही अंतराळवीरांना फक्त आठ दिवसांकरिता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविण्यात आले होते. पण त्यांच्या परतीसाठी नियोजित करण्यात आलेल्या Boeing अंतराळयाना मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे ही मोहीम आता फेब्रुवारी 2025 पर्यंत पुढे नेण्यात आली आहे. ही घटना जरीही कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे झाली असली तरीसुद्धा यामुळे भविष्यातील वैश्विक अन्वेषणावरील परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
Boeing Starliner या अंतराळयानाचे मुख्य काम होते, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणणे परंतु स्थानकाकडे जात असताना यामध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाले. ज्यामध्ये हेलियम गळती सोबत अन्य बिघाड पाहण्यात आले होते. ह्याच कारणामुळे हे अंतराळयान कोणत्याही अंतराळवीराशिवाय पृथ्वीवर परतले. NASA आणि Boeing यामध्ये झालेल्या चर्चेनंतर NASA ने कोणतीही जोखीम न उचलता सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निवडले.
त्यासोबतच Financial Times ने सादर केलेल्या एका अहवालामध्ये NASA ने Boeing Starliner वर अवलंबून राहण्या ऐवजी आता SpaceX या एलोन मस्कच्या अंतराळ संस्थेची मदत घेण्याचे ठरवले आहे. ज्याचे SpaceX dragon हे अंतराळयान International Space Station वर अडकलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याचे काम पार पाडेल.
NASA चा SpaceX कडे वळण्याचा निर्णय हा Boeing साठी एक अतिशय अनपेक्षित धक्क्यासारखा आहे. ह्या घटनेमुळे कंपनीच्या स्पेस डिव्हिजनसमोर येणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. Boeing स्टारलाइनर आधीच ठरलेल्या वेळेच्या मागे आणि बजेटपेक्षा जास्त आहे आणि ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना असूनही, NASA ही संस्था Boeing चा पूर्णपणे त्याग करेल हे शक्य नाही. कारण एजन्सी ऐतिहासिकदृष्ट्या अंतराळवीरांच्या स्पेस मिशनसाठी अनेक कंत्राटदारांवर अवलंबून आहे. परंतु ही मोहीम राबविण्यात होणाऱ्या विलंबाकडे पाहता NASA या अंतराळ संस्थेला महत्वाचा निर्णय घेणे आवश्यक आहे. आणि तोपर्यंत हे दोन्ही अंतराळवीर Insternational Space Station वरील इतर अंतराळवीरांसोबत म्हणून काम करणार आहेत.
आपण या गोष्टीकडे जरा देखील दुर्लक्ष करता कामा नये की, या विस्तारित मोहिमेमुळे अंतराळवीरांसाठी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. अंतराळ किरणोत्सर्ग आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या प्रदीर्घ प्रदर्शनाचा भौतिक परिणाम यासारख्या जोखमींसोबत प्रवास करणे ही सोपी गोष्ट नाही आहे. पण International Space Station हे कमी पृथ्वी कक्षा आणि विशेष संरक्षणामुळे या धोक्यांपासून काही प्रमाणात संरक्षण प्रदान करते. सर्वोतोपरी आता फक्त या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर केव्हा करत आणले जाईल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
जाहिरात
जाहिरात