गुवाहाटी येथे स्थित भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO या दोन्ही संस्थांच्या संशोधकांनी पहिल्या ज्ञात गॅलेक्टिक अल्ट्राल्युमिनस X-ray उत्सर्जक पल्सर, Swift J0243.6+6124 चा अभ्यास करत असताना एका महत्त्वपूर्ण गोष्टीचा शोध लावण्यात यश प्राप्त केले आहे. त्यांचे सहयोगी संशोधन असे दर्शविते की या पल्सरद्वारे उत्सर्जित होणाऱ्या X-ray किरणांचे ध्रुवीकरण हे अपेक्षेपेक्षा लक्षणीयरीत्या खूपच कमी आहे, जे या खगोलीय संस्थांमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनच्या विद्यमान सिद्धांतांना आव्हान देताना दिसून येत आहे. हे परिणाम X-ray न्यूट्रॉन ताऱ्यांच्या सभोवतालच्या मजबूत चुंबकीय क्षेत्राशी कसा संवाद साधतो याविषयीच्या दीर्घकालीन विश्वासांना देखील आव्हान देते.
वर्ष 2017 ते 2018 च्या दरम्यान NASA च्या स्विफ्ट अंतराळयानाद्वारे Swift J0243.6+6124 एका तीव्र X-ray उद्रेका दरम्यान निदर्शनास आले होते. आणि तेव्हापासूनच अल्ट्राल्युमिनस X-ray स्त्रोतांचे स्वरूप म्हणजेच ULXs समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांसाठी हा एक अभ्यासाचा मुख्य विषय बनला आहे. ULXs हे सामान्यपणे इंटरमीडिएट मास ब्लॅक होलशी संबंधित मानले जातात पण काही Swift J0243.6+6124 सारखे, पल्सर असल्याचे देखील मानले जाते. पल्सर हे एक प्रकारचे न्यूट्रॉन तारे असतात, जे स्वतःच्याच गुरुत्वकर्षणाखाली कोसळलेले असतात.
.
NASA चे इमेजिंग एक्स रे पोलरीमेट्री एक्सप्लोरर म्हणजेच IXPE, न्यूट्रॉन स्टार इंटिरियर कंपोझिशन एक्सप्लोरर म्हणजेच NICER आणि न्यूक्लियर स्पेक्ट्रोस्कोपिक टेलीस्कोप ॲरे म्हणजेच NuSTAR यांसोबत करण्यात आलेल्या मिशन मधील डेटा वापरून, संशोधकांनी Swift J0243.6+6124 वरून X-ray किरणांच्या ध्रुवीकरणाचा काही सक्रिय टप्प्यांमध्ये 2023 या वर्षी सखोल अभ्यास केला. या अभ्यासात संशोधकांच्या निदर्शनास असे आले की, X-ray किरणांचे ध्रुवीकरण हे केवळ 3% एवढेच आहे, जे विद्यमान मॉडेल्सच्या अंदाजापेक्षा खूपच कमी होते. हा शोध बायनरी सिस्टीममधील न्यूट्रॉन ताऱ्यांच्या सभोवतालच्या मजबूत चुंबकीय क्षेत्रांशी संवाद साधतो तेव्हा X-ray कसे वागतात याविषयी दीर्घकाळ चाललेल्या गृहितकांना आव्हान देण्यास प्रवृत्त करते.
Swift J0243.6+6124 मधील कमी ध्रुवीकरणामुळे न्यूट्रॉन ताऱ्यांच्या किरणोत्सर्गाच्या वर्तनावर सध्याच्या सिद्धांतांचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते हे लक्षात घेऊनच इस्रोचे संशोधक डॉ. अनुज नंदी यांनी या निष्कर्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. डॉ. नंदी यांच्या मते, IXPE मिशनच्या क्षमतांनी या कमी ध्रुवीकरण पातळी शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
IIT गुवाहाटी येथील प्रा.संतब्रत दास यांनीही या शोधाच्या महत्त्वावर भाष्य करताना स्पष्टपणे आपले मत मांडले आणि व्यक्त केले की अनपेक्षितपणे कमी ध्रुवीकरण हे सूचित करते की न्यूट्रॉन ताऱ्यांभोवती चुंबकीय क्षेत्र आणि X-ray उत्सर्जन नियंत्रित करणाऱ्या प्रक्रियांबद्दलची आपली समज अद्ययावत करणे आवश्यक आहे. IIT गुवाहाटी आणि इस्रोच्या शोधामुळे एक्स-रे पल्सर आणि इतर तत्सम वैश्विक घटनांचा अभ्यास करण्यासाठी नवीन दरवाजे उघडण्यास मदत झाली आहे. शास्त्रज्ञांनी विश्वाच्या गूढ गोष्टींचा शोध सुरू ठेवल्यामुळे, हा अनपेक्षित शोध पुढील संशोधनास प्रेरणा देईल आणि अंतराळात काम करत असलेल्या जटिल शक्तींबद्दल सखोल समजून घेईल, अशी अपेक्षा भविष्यातील असंख्य संशोधनांन कडून केली जात आहे.
जाहिरात
जाहिरात