Infinix या स्मार्टफोन कंपनीने नुकताच आपला लॅपटॉप म्हणजेच Infinix InBook Y3 Max भारतामध्ये लॉन्च केला आहे. यावर आपले मत मांडताना कंपनीकडून असे सांगण्यात येते की, हा लॅपटॉप आजवरील त्यांच्या लॅपटॉपच्या तुलनेत अधिक प्रगत आहे, पण त्यासोबतच आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट कामगिरी पार पाडण्यात देखील सक्षम आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत Infinix च्या Infinix InBook Y3 Max या लॅपटॉपची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता.
Infinix InBook Y3 Max ची वैशिष्ट्ये.
Infinix InBook Y3 Max हा लॅपटॉप 12 व्या जनरल इंटेल कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, ज्यामध्ये तुम्हाला i3, i5 आणि i7 अशा तीन कोअर प्रोसेसरचे पर्याय देखील निवडता येतात. या प्रोसेसरची रॅम 16GB पर्यंत LPDDR4X ही असून आणि 1TB पर्यंतच्या क्षमतेचा PCIe 3.0 SSD स्टोरेजसोबत जोडण्यात आलेला आहे. लॅपटॉपमध्ये एक समर्पित SATA स्लॉट देखील दिला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना 1TB पर्यंत अतिरिक्त स्टोरेज क्षमता वाढवता येऊ शकते.
Infinix InBook Y3 Max या लॅपटॉप मध्ये 16 इंचाचा फुल HD IPS डिस्प्ले बसविण्यात आला आहे. या लॅपटॉपचा कीबोर्ड हा अल्ट्रा रिस्पॉन्सिव्ह आणि टॅक्टाइल बॅकलिट कीबोर्ड असल्याने कमी प्रकाशात सुध्दा तुम्हाला आरामात टायपिंग करता येण्यासाठी सक्षम आहे. सोबतच मल्टी टच कंट्रोलसह 7.06 इंचाचा टचपॅड अचूक इनपुट देण्यास समर्थ आहे. Infinix ने अलीकडेच लॉन्च केलेला हा लॅपटॉप 65W चार्जिंग चे समर्थन तर करतोच पण त्यासोबतच यामध्ये 70Wh ची बॅटरी सुद्धा बसविण्यात आली आहे. या बॅटरीचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर, तुम्ही कोणतेही काम करत असल्यास ती 14.6 तास आरामात चालू शकते आणि 8.5 तासांचा विडियो प्लेबॅक वेळ देण्यासही सक्षम आहे.
उत्कृष्ट ऑडिओ अनुभवासाठी, Infinix च्या Infinix InBook Y3 Max या लॅपटॉपमध्ये स्पष्ट आवाज पकडण्यासाठी दोन मायक्रोफोन दिले आहेत. हा लॅपटॉप Windows 11 वर चालतो, ज्याचे वजन फक्त 1.78 किलोग्रॅम इतके आहे. या लॅपटॉपची रॅम क्षमता 16GB पर्यंत असून स्टोरेज क्षमता 512GB पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. Infinix InBook Y3 Max ची किंमत आणि उपलब्धता.
भारतामध्ये Infinix InBook Y3 Max हा लॅपटॉप बुधवारी दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च करण्यात आला असला तरीसुध्दा तो अजूनही खरेदीसाठी उपलब्ध झालेला नाही. त्यासाठी Infinix च्या चाहत्यांना 21 ऑगस्ट 2024 पर्यंत वाट पहावी लागणार आहे, कारण 21 ऑगस्टपासूनच हा लॅपटॉप फ्लिपकार्ट वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. चंदेरी आणि निळा अशा दोन रंगांमध्ये हा लॅपटॉप उपलब्ध असून याच्या i3 प्रोसेसर प्रकाराची किंमत भारतात 29,990 रुपयांपासून सुरू होत आहे. Infinix InBook Y3 Max च्या विविध प्रोसेसर पर्यायांनुसार किंमतीमध्ये बदल दिसून येत आहे.