जिओ च्या युजर्स चं टेंशन होणार दूर, मिळणार वर्षभर अगदी मोफत इंटरनेट
रिलायंस जिओ कडून जिओ एअर फायबरच्या ग्राहकांना येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धमाकेदार ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये JioAirFiber subscription घेणार्यांना वर्षभर अगदी मोफत इंटरनेट सेवा मिळणार आहे. जुन्या आणि नवीन अशा दोन्ही ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेणार आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी, नवीन ग्राहकांना रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये उत्पादनांची खरेदी करावी लागेल, तर सध्याच्या युजर्सना याचा लाभ घेण्यासाठी तीन महिन्यांच्या विशेष JioAirFiber योजनेसह रिचार्ज करावा लागेल