काय आहेत, Moto G45 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये

Motorola या कंपनीकडून Moto G45 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च करण्यात येणार आहे

काय आहेत, Moto G45 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये
महत्वाचे मुद्दे
  • Moto G45 5G मध्ये 50-मेगापिक्सलचा क्वाड पिक्सेल हा मुख्य कॅमेरा आहे.
  • हा स्मार्टफोन 8GB रॅम + 128GB स्टोरेज अशा प्रकारामध्ये उपलब्ध.
  • Moto G45 5G कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह बनविण्यात आला आहे.
जाहिरात
Motorola ही स्मार्टफोन कंपनी आपल्या G सिरीजचा विस्तार करणार असून या मालिकेचा पुढचा स्मार्टफोन म्हणजेच G45 भारतात ऑगस्ट 2024 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन जानेवारी महिन्यातच लॉन्च झालेल्या Motorola च्या Moto G34 चा उत्तराधिकारी असून हा सर्वसामान्यांना देखील परवडणारा स्मार्टफोन असणार आहे. चला तर मग बघूया, काय आहेत Moto G45 5G या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता. 

Moto G45 5G ची किंमत, उपलब्धता आणि बरेच काही. 

Motorola या कंपनीकडून Moto G45 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण म्हणजे या स्मार्टफोनची डिझाईन ही विगन लेदरने बनवलेली असून मजेंटा, निळा आणि हिरवा अशा तीन रंगांमध्ये वापरकर्त्यांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन Flipcart आणि Motorola च्या अधिकृत वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. अद्यापही Motorola कडून Moto G45 5G या स्मार्टफोनची किंमत काय असेल यावर कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नसून अंदाजे या स्मार्टफोनची किंमत ही 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

Moto G45 5G या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये. 

FlipKart वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार Moto G45 5G या स्मार्टफोनचा 6.33 इंचाचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सोबत बनविण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 120Hz चा रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले सोबतच Snapdragon 6s Gen 3 SoC या चीपसेट द्वारे समर्थित असणार आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित असलेल्या HelloUI या प्रोसेसर द्वारे समर्थित आहे. Motorola कडून या गोष्टीची पुष्टी करण्यात येत आहे की, चांगल्या ध्वनी अनुभवासाठी या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी ॲटमॉस आणि हाई रेस ऑडियोचे समर्थन देण्यात येत आहे. 

Moto G45 5G या स्मार्टफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असून 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सिंग सेन्सर LED फ्लॅश लाईट सह जोडण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनची किमान रॅम ही 8GB पासून तर स्टोरेज क्षमता 128GB पासून सुरू होत आहे. रॅम आणि स्टोरेजच्या आधारे या स्मार्टफोनमध्ये किती प्रकार पडू शकतात याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसून याबाबत स्पष्टता ही Moto G45 5G लॉन्च झाल्यानंतरच मिळेल. 

या स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर सुध्दा देण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा एक स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारा स्मार्टफोन असल्याने Moto G34 पेक्षा थोडा प्रगत स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनच्या उजव्या बाजूस पॉवर की सोबतच ध्वनी बटणे सुद्धा देण्यात आलेली आहेत. तसेच Moto G45 5G या स्मार्टफोनच्या खालील बाजूस USB Type-C port, स्पीकर आणि 3.5mm चा ऑडियो जॅक बसविण्यात आला आहे.
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »