Google ची Pixel 9 सिरीज झाली लॉन्च, काय आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत.

Google ची Pixel 9 सिरीज झाली लॉन्च, काय आहेत वैशिष्ट्ये आणि किंमत.

Photo Credit: Google

महत्वाचे मुद्दे
  • Pixel 9 सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन समाविष्ट करण्यात आले आहेत.
  • Pixel 9 आणि Pixel 9 Pro मध्ये 4,700mAh ची बॅटरी आहे.
  • हे तीनही स्मार्टफोन Android 14 वर चालतात.
जाहिरात
मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी Google या कंपनीने Made By Google या कार्यक्रमादरम्यान Google Pixel 9 सिरिजचे चार स्मार्टफोन लॉन्च केले. या स्मार्टफोन लॉन्च सोबत गुगल या गोष्टीची पुष्टी करत आहे की वापरकर्त्यांना नवीन तंत्रज्ञानासोबतच आधुनिक वैशिष्ट्यांचाही अनुभव स्मार्टफोन द्वारे देता येईल. नुकत्याच लॉन्च झालेल्या Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL या तीनही स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता आपण या ब्लॉग द्वारे जाणून घेणार आहोत.

Pixel 9 ची वैशिष्ट्ये आणि किंमत.


Pixel 9 या स्मार्टफोनमध्ये 1080 × 2424 पिक्सेलच्या रेसोल्युशन सोबत 60Hz ते 120 Hz चा रिफ्रेश रेट असलेला 6.3 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेची तेजस्विता ही 1800nits ते 2700nits पर्यंत वाढवता येऊ शकते. Pixel 9 Google च्या Tensor G4 या प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस दोन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. 

Pixel 9 या स्मार्टफोनची बॅटरी 4700 mAh ची असून 45 व्हॅटच्या जलद चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगचे देखील समर्थन करते. या स्मार्टफोनची रॅम ही 12GB इतकी असून 128GB आणि 256GB अशा दोन स्टोरेज प्रकारांमध्ये मोडतो. Android 14 वर आधारित हा स्मार्टफोन 7 वर्षांपर्यंत Android OS आणि सुरक्षेचे वचन देतो. Pixel 9 या स्मार्टफोनची किंमत ही 74,999 रुपयांपासून सुरू होत आहे. ऑब्सिडियन, पोर्सिलेन, विंटरग्रीन, पेनी, हेझेल आणि रोझ या 6 रंगांमध्ये 22 ऑगस्टपासून खरेदी साठी फ्लिपकार्ट सोबतच रिटेल स्टोअर्स मध्येही उपलब्ध आहे.
 

Pixel 9 Pro ची वैशिष्ट्ये आणि किंमत.


Google Pixel 9 Pro हा पुढचा किंवा थोडा अधिक प्रगत स्मार्टफोन म्हणू शकतो. Pixel 9 Pro मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 कोटिंगसोबतच 1Hz ते 120Hz चा रिफ्रेश रेट असलेला 6.3-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले पॅनेल आणि 1280 x 2856 पिक्सेलचे उच्च रिझोल्यूशन सुध्दा देण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस तीन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 48 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्येही 4700mAh ची बॅटरी दिलेली असून ती 45W जलद आणि वायरलेस चार्जिंगचे समर्थन करते.

Pixel 9 Pro या स्मार्टफोनची रॅम 16GB इतकी असून 128GB ते 1TB पर्यंतच्या स्टोरेज क्षमतेनुसार या स्मार्टफोनचे वेगवेगळे प्रकार पडतात, ते सहा रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची किंमत 94,999 रुपयांपासून सुरू होत असून फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स वेबसाईट आणि क्रोमा आणि रिलायन्स डिजिटल सोबतच गुगलच्या केंद्रावर देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

Pixel 9 Pro XL ची वैशिष्ट्ये आणि किंमत.


Pixel 9 आणि Pixel 9 Pro पेक्षा आकाराने मोठा असलेला स्मार्टफोन म्हणजे Pixel 9 Pro XL. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 कोटिंगने सुरक्षित 6.8-इंचाचा 24-बिट LTPO OLED डिस्प्ले आणि 1344 x 2992 पिक्सेलचे रिझोल्यूशन असलेला डिस्प्ले बसविण्यात आलेला आहे. Pixel 9 च्या बाकी स्मार्टफोन प्रमाणेच हा स्मार्टफोन सुध्दा Tensor G4 या Google च्या प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस तीन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 48 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. 

Pixel 9 Pro XL हा स्मार्टफोन 16GB रॅम सोबत आणि 128GB, 256GB, 512GB आणि 1TB अशा विविध स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5060 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी फक्त 30 मिनिट चार्ज केल्यानंतर 70% पर्यंत चार्ज होते. याची किंमत 1,14,999 रुपये इतकी आहे.
 
Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »