चीनने बनविले आहे चंद्रावरील मातीपासून पाणी
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आणि मंगळ हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह असल्याने भविष्यात मानवाच्या अस्तित्वासाठी ही दोन्ही ठिकाणे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यातच चंद्रावरील माती वापरून चिनी संशोधकांनी पाण्याची निर्मिती केली आहे ज्यामुळे भविष्यात आपले चंद्रावर अस्तित्व निर्माण करण्यास मदत होणार आहे.